मिठाईसाठी खवा विकत घेताय, अशा प्रकारे ओळखा भेसळयुक्त खवा
भेसळयुक्त मिठाईचे प्रमाण वाढल्यामुळे आजकाल खवा विकत आणून मिठाई घरीच तयार केली जात आहे. पण खवासुद्धा बनावट किंवा निकृष्ठ दर्जाचा असू शकतो. त्यामुळे योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. भेसळयुक्त खवा अनेक प्रकारे ओळखता येऊ शकतो.
Follow us
दिवाळी, भाऊबीजच्या निमित्ताने आपण एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा देतो. या काळात मिठाईची मागणी वाढते. त्यामुळे बनावट खव्यापासून मिठाई तयार करण्याचे प्रकारही वाढतात.
भेसळयुक्त मिठाईचे प्रमाण वाढल्यामुळे आजकाल खवा विकत आणून मिठाई घरीच तयार केली जात आहे. पण खवासुद्धा बनावट किंवा निकृष्ठ दर्जाचा असू शकतो. त्यामुळे योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. भेसळयुक्त खवा अनेक प्रकारे ओळखता येऊ शकतो.
पाच मिली लीटर गरम पाण्यात 3 ग्रॅम खवा टाका. त्याला थोडं थंड होऊ द्या, त्यानंतर खव्यात आयोडीनचे सोल्यूशन टाका. काही मिनिटांनतर खव्याचा रंग निळा पडला तर तो खवा भेसळयुक्त आहे.
भेसळयुक्त खवा ओळखण्यासाठी थोडासा खवा आपल्या हातावर घ्या. तो तळहातावर थोडा चोळा. जर खवा फाटला, किंवा त्याचा गोळा तयार झाला नाही तर समजून घ्या की खवा भेसळयुक्त आहे.
चाखूनसुद्धा शुद्ध आणि भेसळयुक्त खवा ओखळता येतो. खवा जर चिकट लागत असेल तर समजून घ्या की, तो खराब झालेला आहे. शुद्ध खव्याची चव कच्च्या दुधासारखी लागते.
पाण्यात टाकल्यानंतर खवा फुटत असेल तर तुम्ही विकत घेतलेला खवा हा खराब झालेला आहे. भेसळयुक्त खवा, मिठाईमुळे किडनीवर परिणाम होतात. त्यामुळे वरील खबरदारी घेतली तर आपण या दिवाळीत शुद्ध मिठाईची चव चाखू शकतो.