‘दिल तो हैप्पी है जी’ सिरियलमधील अभिनेत्रीची आत्महत्या
'दिल तो हैप्पी है जी' या मालिकेतील प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री सेजल शर्मा हिने राहत्या घरी गळफास घेत (Dil Toh Happy Hai Ji actress Sejal Sharma suicide) आत्महत्या केली आहे.
मुंबई : ‘दिल तो हैप्पी है जी’ या मालिकेतील प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री सेजल शर्मा हिने राहत्या घरी गळफास घेत (Dil Toh Happy Hai Ji actress Sejal Sharma suicide) आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल (24 जानेवारी) सकाळी सेजलने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. ‘दिल तो हैप्पी है जी’ या मालिकेत सेजल ही अंश भाररीच्या बहिणीचा रोल करत होती.
सेजल ही मिरारोड मधील शिवार गार्डन परिसरातील रॉयल नेस्ट बिल्डिंगमध्ये राहत होती. सेजलने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सेजलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्टपणे समजू शकलेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजाद्वारे हे प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहे. याप्रकरणी अधिक तपास मिरारोड पोलीस करीत (Dil Toh Happy Hai Ji actress Sejal Sharma suicide) आहेत.
त्याशिवाय पोलिसांना तिच्या घरी एक सुसाईड नोट सापडली आहे. यात माझ्या आत्महत्त्येसाठी कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहिले आहे. मात्र तिने नेमकी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सेजल ही मूळ राजस्थानमधील उदयपूर येथील होती. ती कामानिमित्त मिरारोड येथे वास्तव्यास होती.
पोलिसांनी सेजलचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच तिचा मृतदेह भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
सेजल ही दिल तो हॅपी है जी यासारख्या सुपरहिट मालिकेत काम करत होती. तो तिचा पहिला टीव्ही शो होता. तिला लहानपणापासून अभिनेत्री व्हायची इच्छा होती. सेजलला 2017 ला मुंबईला आली. त्यानंतर तिने ऑडिशन देण्यास (Dil Toh Happy Hai Ji actress Sejal Sharma suicide) सुरुवात केली.