DDLJ 25 | ट्विटरवर पुन्हा एकदा ‘राज मल्होत्रा’ आणि ‘सिमरन’ची एंट्री, चाहते म्हणाले ‘जा सिमरन, जा.. जी ले अपनी जिंदगी’
अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल देवगण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलून ‘राज मल्होत्रा’ आणि ‘सिमरन’ असे केले आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये मैलाचा टप्पा ठरलेला चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ला (Dilwale Dulhania Le Jayenge) प्रदर्शित होऊन आज (20 ऑक्टोबर) 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल देवगण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलून ‘राज मल्होत्रा’ आणि ‘सिमरन’ असे केले आहे. इतकेच नव्हे तर, राज आणि सिमरनचे फोटोदेखील डीपी म्हणून ठेवले आहेत. 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी या चित्रपटाच्या आठवणींना अनोख्या पद्धतीने उजाळा दिला आहे. तर, नेटकऱ्यांनीही ‘जा सिमरन, जा.. जी ले अपनी जिंदगी’ हा आयकॉनिक संवाद कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Dilwale Dulhania Le Jayenge completed 25 years : shahrukh khan and Kajol change their twitter DP name as Raj Malhotra and Simran)
शाहरुख बनला ‘राज मल्होत्रा’
25 years!!! Filled with gratitude towards you for loving Raj & Simran, with all your heart. This always feels special. #DDLJ25 @yrf pic.twitter.com/HHZyPR29f9
— Raj Malhotra (@iamsrk) October 20, 2020
काजोललाही आली ‘सिमरन’ची आठवण
Raj & Simran! 2 people, 1 film, 25 years and the love doesn’t stop coming in!
I am truly grateful to all the people who made it what it is today.. a phenomenon and a part of their own history. The fans! Big shoutout to all of you♥️#25YearsOfDDLJ @yrf@iamsrk #AdityaChopra pic.twitter.com/ikkKFef6F1
— Simran (@itsKajolD) October 20, 2020
चित्रपट रचणार आणखी एक इतिहास
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अनेक विक्रम केले आहेत. आदित्य चोप्राच्या या चित्रपटाने ‘डर’ आणि ‘बाजीगर’च्या शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमान्स’ बनवले होते. तर, काजोल आणि शाहरुखची जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी बनली होती. राज आणि सिमरनच्या या प्रेमकथेचे लोक इतके वेडे झाले की, आजही ते मुंबईतील ‘मराठा मंदिरात’ हा चित्रपट बघायला जातात. 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता आणखी एक इतिहास घडवणार आहे. चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने लंडनमध्ये शाहरुख आणि काजोल अर्थात राज आणि सिमरन यांचा कांस्य पुतळा बसवला जाणार आहे. (Dilwale Dulhania Le Jayenge completed 25 years : shahrukh khan and Kajol change their twitter DP name as Raj Malhotra and Simran)
लंडनमध्ये बॉलिवूड चित्रपटातील पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिली वेळ आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे (Dilwale Dulhania Le Jayenge) एक दृश्य रिक्रीएट केले जाणार आहे. हा पुतळा लिसेस्टर स्क्वेअरमध्ये ‘सीन इन द स्क्वेअर’ म्हणून स्थापित केला जाणार आहे. जो या चित्रपटाची आणि बॉलिवूडची लोकप्रियता जगभरात दाखवणार आहे. ‘हार्ट ऑफ लंडन बिझिनेस अलायन्स’ चे मार्क विल्यम्स यांनी ही माहिती दिली आहे.
“हम तो सब हिंदुस्तान में फ़ेल हुए, तूने लंदन में फ़ेल हो कर दिखा दिया…” “मोहब्बत का नाम आज भी मोहब्बत है, ये ना कभी बदली है और न कभी बदलेगी..” Proud to be part of this film which completes 25 years today. ?our love has been a constant!! ?hank you!! ?? #Pops #DDLJ25@??? pic.twitter.com/H0kKs9RrpS
— Anupam Kher (@AnupamPKher) October 20, 2020
‘डीडीएलजे’ चित्रपटाची क्रेझ
‘डीडीएलजे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) चित्रपटाची क्रेझही लोकांच्या डोक्यावरुन उतरलेली नाही. जेव्हा जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर लागतो, तेव्हा बहुतेक लोकांना चॅनेल बदलावे असे वाटतच नाही. चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित अशा बर्याच कथा आहेत ज्या वाचून किंवा ऐकून आजही लोक आश्चर्यचकित होतात. या चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याचवेळी सप्टेंबर 1995मध्ये आमिर खानचा ‘रंगिला’ चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दोन्ही चित्रपटांना एकाचवेळी अनेक नामांकने मिळाली होती.
(Dilwale Dulhania Le Jayenge completed 25 years : shahrukh khan and Kajol change their twitter DP name as Raj Malhotra and Simran)