तुळजाभवानी मंदिरात VIP भक्तांचा सुळसुळाट, सामान्य भाविकांच्या रांगा तर आमदार, अभिनेत्रींना थेट दर्शन!

तुळजाभवानी मंदिर उघडताच दर्शनासाठी VIP भक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य भाविक मात्र तासनतास रांगेत उभं राहून देवीचं दर्शन घेत आहेत. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी सहकुटुंब VIP कोट्यातून देवीचं दर्शन घेतलं आहे.

तुळजाभवानी मंदिरात VIP भक्तांचा सुळसुळाट, सामान्य भाविकांच्या रांगा तर आमदार, अभिनेत्रींना थेट दर्शन!
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 3:47 PM

तुळजापूर: राज्य सरकारनं दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीचं मंदिरंही सुरु करण्यात आलं आहे. मंदिर उघडताच दर्शनासाठी VIP भक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य भाविक मात्र तासनतास रांगेत उभं राहून देवीचं दर्शन घेत आहेत. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी सहकुटुंब VIP कोट्यातून देवीचं दर्शन घेतलं आहे. तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी VIP दर्शनाचा मोठा घोळ समोर आला होता. आताही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. (Direct darshan to VIP devotees at Tulja Bhavani temple, while queues of devotees)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीही VIP ट्रिटमेंटला फाटा देत प्रवेशद्वारावरुनच तुळजाभवानीचं दर्शन घेतलं होतं. तर दुसरीकडे आमदार मंडळी, त्यांचे स्विय सहाय्यक, काही प्रशासकीय अधिकारी वशिलेबाजी करत VIP दर्शनाचा लाभ घेत आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आपल्या 10 वर्षाखालील मुलाला घेऊन तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आले होते. तर अभिनेत्री नेहा पेंडसे यांनीही पोलिस बंदोबस्तात देवीचं दर्शन घेतलं. विशेष बाब म्हणजे दर्शन पास काऊंटर बंद असतानाही या मंडळींना देवीचं दर्शन प्रशासनाने घडवून दिलं. VIP दर्शनाबाबत आमदार काळे यांना विचारलं असता त्यांनी असं काही केलं नसल्याचं सांगितलं. पण VIP दर्शन रजिस्टरमधील नाव दाखवल्यावर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे अभिनेत्री नेहा पेंडसेच्या गाडीचा ताफा तर थेट मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आणण्यात आला होता. दरम्यान, मंदिर प्रशासनानं काहींनी VIP दर्शन घेतल्याचं मान्य केलं आहे. एकीकडे मंदिराबाहेर सर्वसामान्य नागरिक देवीचं दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहत आहेत. तर तथाकथित VIP मंडळी देवीचं थेट दर्शन घेत आहेत. त्यामुळे मंदिरात सामान्य माणूस आणि VIP असा भेदभाव का केला जात आहे? असा सवाल आता विचारला जात आहे.

तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!

तुळजाभवानी मंदिर परिसरात पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं चित्र पहायला मिळालं. त्याचबरोबर भाविक, पुजारी आणि व्यापारी मास्कविना फिरताना पाहायला मिळाले. महत्वाची बाब म्हणजे मंदिर संस्थान, पोलीस आणि नगर परिषदेकडूनही मास्क न वापरणाऱ्यांना रोखण्याची तसदी घेतली गेली नाही. मंदिर परिसरातील हळद-कुंकु, फुले आदी व्यापाऱ्यांनी मास्क न घालता दुकानं बिनदिक्कत सुरु ठेवली होती. इतकच नाही तर सरकारकडून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पण 65 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनाही दर्शनासाठी मंदिरात आणण्यात आलं होतं. दर्शन रांगेतही अनेक भाविक विना मास्क उभे होते. तर थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर यंत्रणाही कार्यान्वित नव्हती.

संबंधित बातम्या:

तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!, भाविक, पुजारी, व्यापारीही मास्कविना, ज्येष्ठांनाही मंदिरात प्रवेश

शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअ‍ॅलिटी चेक

Direct darshan to VIP at Tulja Bhavani temple, while queues of devotees

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.