दिग्गदर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सई अभिनेता सलमान खानच्या येणाऱ्या 'दबंग 3' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
सई दंबग 3 चित्रपटात सलमानच्या फ्लॅशब्लॅकमधील भूमिकेत त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे.
लहान असताना सलमान सईला भेटला होता. सई मोठी झाल्यावर सलमानला सई या भूमिकेसाठी योग्य वाटल्याने तिला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सईचं दबंग 3 मधील शूटिंग पूर्ण झालं आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दबंग 3 मधील सईचा लूक प्रेक्षकांच्या समोर नको यावा यासाठी शूटिंग दरम्यान सर्व यूनिटला मोबाईल न वापरण्याचे आदेश दिले होते.
सई दबंग 3 नंतर आणखी काही चित्रपटातही झळकणार असल्याचं बोललं जात आहे.