Sushant Singh Rajput | संजय लीला भन्साळी यांनी सुशांतबाबत पोलिसांना काय सांगितलं?

सुशांत सिंग यश राज फिल्म्सबरोबर करारबद्ध होता आणि त्याच काळात भन्साळी यांनी सुशांतला काही चित्रपट ऑफर केले होते.

Sushant Singh Rajput | संजय लीला भन्साळी यांनी सुशांतबाबत पोलिसांना काय सांगितलं?
Follow us
| Updated on: Jul 07, 2020 | 3:53 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी (Sanjay Leela Bansali Statement About Sushant Singh Rajput) प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा काल (6 जुलै) जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा जबाब फारच महत्त्वपूर्ण आहे. सुशांत सिंग यश राज फिल्म्सबरोबर करारबद्ध होता आणि त्याच काळात भन्साळी यांनी सुशांतला काही चित्रपट ऑफर केले होते (Sanjay Leela Bansali Statement About Sushant Singh Rajput).

भन्साळी यांनी सुशांतला जवळजवळ चार चित्रपट ऑफर केले होते. मात्र, सुशांत यशराज फिल्म्सच्या ‘पाणी’ सिनेमाच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे, तसेच तारखांच्या गोंधळामुळे तो काम करु शकला नाही, अस भन्साळी यांनी आपल्या जबाबात सांगितलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या जबाबात काय म्हटलं?

“संजय लीला भन्साळी यांनी आपल्या जबाबात म्हटलं, मी चार चित्रपट बनवणार होतो.

1) राम लीला

2) बाजीराव मस्तानी

3) पद्मावत

4) रीड

यापैकी तीन चित्रपट बनवले. चौथा ‘रीड’ हा चित्रपट बनला नाही. ‘रामलीला’ चित्रपट बनवत होतो. त्यावेळी मी सुशांतला माझ्या चित्रपटात काम करणार का, असं विचारलं होतं. मात्र, त्यावेळी तो यशराज फिल्म्ससोबतच्या करारात अडकला होता. यशराज फिल्म्स त्यावेळी ‘पाणी’ चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. सुशांतही या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त होता. त्याच्या तारखा व्यस्त होत्या. त्यामुळे मला त्याला माझ्या चित्रपटात घेता आलं नाही. आधीच्या तीन चित्रपटांसाठी मी त्याला विचारलं होतं, व्यस्त असल्याने तो माझ्या चित्रपटांमध्ये काम करु शकला नव्हता. तो वेळ देऊ शकत नव्हता, त्यामुळे मी माझ्या चित्रपटांसाठी दुसऱ्या अभिनेत्याची निवड केली.”

Sanjay Leela Bansali Statement About Sushant Singh Rajput

“मी कोणाच्या सांगण्यावरुन माझ्या चित्रपटाचा नायक निवडत नाही. मी जेव्हा रामलीला चित्रपट बनवत होतो, तेव्हा सुरुवातीला मी अभिनेता इम्रान अब्बास याला मुख्य भूमिकेसाठी निवडलं होतं. पण, त्याला काम करणं शक्य न झाल्याने मी सुशांतशी संपर्क साधला. पण, तो यशराज फिल्म्सच्या करारामध्ये बांधला गेला होता. त्याच्या तारखा ब्लॉक झाल्या होत्या. त्याकाळात रणवीरचा ‘बँड बाजा बारात’ चित्रपट चालला होता. त्यामुळे मग मी त्याला माझ्या चित्रपटांमध्ये घेतलं.”

“‘रीड’ हा माझा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. पण त्यासाठी आवश्यक गोष्टी आणि अनेक तांत्रिक बाबी ह्या उपलब्ध होऊ शकल्या नाही. त्या प्रोजेक्टवर मी 2014 मध्ये काम करत होतो. त्यासाठीही मी सुशांतला विचारलं होतं. चित्रपटांसाठी सुशांतकडे तारखा नव्हत्या. मात्र, नंतर तो चित्रपट बनला नाही.”

रणवीरबाबात यशराज फिल्म्सकडून कुठलीही शिफासर नाही – भन्साळी

संजय लीला भन्साळी यांनी आपल्या जबाबात यशराज फिल्म्सबाबतही महत्त्वाची अशी माहिती दिली. “जेव्हा मी बाजीराव मस्तानी बनवत होतो, तेव्हा यशराज फिल्म्सकडून कोणताही अडथळा आणला गेला नाही. एवढेच नव्हे तर यशराज फिल्म्सतर्फे सुशांत ऐवजी रणवीरला घ्या, अशी कुठलीही शिफारस करण्यात आली नव्हती”, असं भन्साळी यांनी सांगितलं.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (14 जून 2020) मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

Sanjay Leela Bansali Statement About Sushant Singh Rajput

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | गाड्यांपासून मोबाईलपर्यंत एकच नंबर, सुशांतच्या लकी नंबरच्या गाड्यांचा लवकरच लिलाव?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.