Sushant Singh Rajput | दिग्दर्शक शेखर कपूर यांचा मुंबई पोलिसांना धक्कादायक ई-मेल

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. शेखर कपूर यांनी ई-मेलच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना त्यांचा जबाब पाठवला आहे.

Sushant Singh Rajput | दिग्दर्शक शेखर कपूर यांचा मुंबई पोलिसांना धक्कादायक ई-मेल
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 4:31 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी (Shekhar Kapoor E-mail To Mumbai Police) प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. शेखर कपूर यांनी ई-मेलच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना त्यांचा जबाब पाठवला आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांना शेखर कपूर यांचाही जबाब नोंदवायचा होता. मात्र, शेखर कपूर मुंबईत उपलब्ध नसल्याने त्यांनी आपला जबाब ई-मेल द्वारे मुंबई पोलिसांना पाठवला आहे (Shekhar Kapoor E-mail To Mumbai Police).

शेखर कपूर यांचा जबाब खूपच धक्कादायक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुशांत सिंग राजपूतने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे म्हटलं जात आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस हा सगळा तपास करत आहे. सुशांत सिंग राजपूत हा डिप्रेशनमध्ये कसा गेला याचा सर्व उलगडा शेखर कपूर यांच्या जबाबातून झाला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

शेखर कपूर यांनी जबाबात काय म्हटलं?

शेखर कपूर त्यांच्या जबाबात म्हणाले, “यशराज फिल्म्सतर्फे ‘पाणी’ हा चित्रपट बनवण्यात येणार होता. या चित्रपटात सुशांतची महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाच्या निर्मितीबाबत मी अनेकदा यशराज फिल्म्सला भेट द्यायचोय याच दरम्यान एकदा सुशांतची आणि माझी ओळख झाली. त्यानंतर आम्ही सतत संपर्कात होतो. 2000 मध्ये यशराज फिल्म्सने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचा बजेट दीडशे कोटी रुपये होता. 2013 मध्ये या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात होणार होती. पुढील दोन ते तीन वर्षात यशराज फिल्म्सने या चित्रपटाची मोठी तयारी केली होती. प्री प्रोडक्शनवर सुमारे 7 कोटी रुपये खर्च केले होते. मोठ्या प्रमाणात या चित्रपटाचं काम सुरु झालं होतं. त्यामुळे मी आणि सुशांत नेहमी संपर्कात होतो.”

“या चित्रपटात सुशांत गोरा गोरा या भूमिकेत होता. या आपल्या भूमिकेसाठी तो प्रयत्न करत होता. सुशांत तुषार या आपल्या भूमिकेला अ‍ॅडिक्ट झाला होता. त्याशिवाय, त्याला दुसरं काहीच सुचत नव्हतं. सुशांत आपल्या भूमिका साकारताना अभिनयासाठी किती वेडा आहे हे तो प्रत्येक क्षणी सिद्ध करत होता. यशराजच्या अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका व्हायच्या. या चित्रपटाबद्दल आमच्या बारीक-बारीक गोष्टींबद्दल चर्चा व्हायच्या, त्या सगळ्या चर्चा सुशांत ऐकायचा.”

“मात्र, पुढे या चित्रपटाच्या निर्मिती बद्दल काही काल्पनिक मुद्द्यांवर माझं आणि आदित्य चोप्रा यांच्यांच मतभेद झाले. काही मुद्यांवर आम्ही सहमत नव्हतो. त्यानंतर हा चित्रपट बनणार नाही, हे कळल्यावर सुशांत खचला होता. खरं तर तो या चित्रपटात एक महत्त्वाचा भाग होता आणि हा चित्रपट त्याचं जीवन बनलं होतं. त्याच्यामुळे त्याचं खचणं हे योग्य होतं.”

“एका संध्याकाळी तो माझ्या घरी आला, गळ्यात पडून खूप रडला. त्याला पाहून मला देखील अश्रू रोखता आले नाही. मलाही रडू कोसळलं. चित्रपट बनणार नसल्याने त्याला मानसिक धक्का बसला होता आणि त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला. हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तू हा चित्रपट नक्की करशील, मी प्रयत्न करेन, फक्त आपण योग्य वेळेची वाट पाहू. तुला निराश व्हायची गरज नाही, योग्य वेळेची वाट पाहा, मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.” (Shekhar Kapoor E-mail To Mumbai Police)

“हा चित्रपट बनणार नाही हे लक्षात आल्यावर तो आणि मी चर्चा करु लागलो. बजेट मोठं होतं. सुशांत सिंहला घेऊन चित्रपट बनवायचं नव्हतं. सुशांतवरती इतका पैसा लावायला कोणी तयार नव्हतं. त्यामुळे मी पिक्चर करण्याचा निर्णय घेतला.”

“मी भारत सोडलं आणि मी लंडनला निघून गेलो. सुशांत माझ्या संपर्कात होता. तो माझ्याशी चर्चा करु इच्छित असायचा, मला त्या विषयावर ती चर्चा नको असायची. काही काळानंतर मी पुन्हा भारतात आलो. सुशांतने मला सांगितलं, यशराजसोबत करार आणि कॉन्टॅक्ट तोडल्यापासून इंडस्ट्रीमध्ये त्याला वेगळी वागणूक दिली जात आहे. चित्रपट मिळू नये यासाठी सुनियोजित पद्धतीने काही लोकांकडून प्रयत्न केले जात आहे. तेव्हा मी समजवलं की, तू फक्त काम करत राहा, तू पुन्हा एकदा यशस्वी होशील, चांगलं नाव कमावशील.”

“त्यानंतर सहा ते सात महिने मी त्याच्या संपर्कात नव्हतो. तो डिप्रेशनमध्ये गेलाय याची मला कल्पना नव्हती. त्याने आत्महत्या केल्याचं मला कळालं, त्यावेळी मला धक्काच बसला.”

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (14 जून 2020) मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

Shekhar Kapoor E-mail To Mumbai Police

संबंधित बातम्या :

Dil Bechara Trailer | सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर लाँच

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतला डिप्रेशनमध्ये कुणी ढकललं? आतापर्यंत 30 जणांचे जबाब

Sushant Singh Suicide Investigation | अभिनेत्री संजना संघीची 9 तास चौकशी, ‘मी टू’च्या कथित आरोपांवर प्रश्न

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.