Oats खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम! वाचा
ओट्स आरोग्यासाठी चांगले असतात असं सांगितलं जातं. ज्या लोकांना व्यायाम करायला आवडतात अशी लोक ओट्स आणि फळांवर खूप जोर देतात. सुरवातीला जेव्हा ओट्स बाजारात उपलब्ध झाले तेव्हा त्याचे फ्लेवर्स नव्हते. आता यात असंख्य फ्लेवर्स आलेले आहेत. काहीजण तर रोज ओट्स खातात.
1 / 5
ओट्समुळे रक्तातील साखर वाढू शकते. यात कार्बोहायड्रेट्स असतात पण जर ओट्स प्रमाणात खाल्ले नाही तर रक्तातील पातळी वाढू शकते. मर्यादित प्रमाणात नसेल तर कॅलरी वाढू शकते, साखर वाढू शकते आणि अर्थातच या सगळ्याने वजन वाढून शकते. मधुमेह असणाऱ्यांना ओट्स मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
2 / 5
ओट्समध्ये फॉस्फरसचे प्रमाण खूप असते. फॉस्फरसचे जास्त सेवन किडनी खराब करू शकते. ज्या-ज्या लोकांना किडनीची समस्या आहे त्या लोकांनी ओट्स कमी खावेत.
3 / 5
बऱ्याच पदार्थांची लोकांना ॲलर्जी असते अगदी गहू, ज्वारी इतर धान्यांचीसुद्धा. तुम्हाला माहितेय का ओट्सची सुद्धाॲलर्जी होऊ शकते? होय. ओट्स खाल्ल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते. काही लोकांचं शरीर ओट्स साठी खूप सवेंदनशील असतं. ॲलर्जी टेस्ट करून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुम्हाला ओट्सची ऍलर्जी आहे का.
4 / 5
ओट्स हे ग्लूटेन फ्री असतात ज्या लोकांना पचनाचा आजार असतो त्या लोकांना ओट्स खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकते. काहींना गॅसचा, पचनाचा प्रॉब्लेम होऊ शकतो.
5 / 5
प्रोसेस्ड ओट्स म्हणजे काय? आता ओट्सचे खूप फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. हे ओट्स खूप प्रक्रिया केलेले असतात, प्रक्रिया करताना साखर, कृत्रिम चव हे सगळं त्यात टाकलं जातं. प्रोसेस्ड ओट्स आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. कमी प्रक्रिया केलेले, साधे ओट्स ज्या ओट्सला कसलंच फ्लेवर नसेल असे ओट्स खा!