Disneyland| कोरोनाचा फटका, जगप्रसिद्ध ‘डिस्नेलँड’मध्ये 28,000 कर्मचाऱ्यांची कपात!
थीम पार्क (Theme Park) मधील 28000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी (Layoff) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांश असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीने जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाने अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. या महामारीच्या काळात काही प्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय देखील घेतला होता. यातच आता जगप्रसिद्ध थीम पार्क ‘डिस्नेलँड’ने (Disneland Theme Park) तब्बल 28,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी (Layoff) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे (Disneyland Theme Park layoff 28000 employees).
कोरोनाचा सर्वाधिक फटका हा पर्यटन क्षेत्राला बसला आहे. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. अशावेळी मोठमोठ्या थीम पार्क (Theme Park) अथवा पर्यटन स्थळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ‘डिस्नेलँड’ने (Disneyland) घेतलेला हा निर्णय याच दाहकतेचे प्रतिबिंब म्हणता येईल.
‘डिस्नेलँड’मध्ये तब्बल 1 लाख कर्मचारी करतात काम
कंपनीने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. थीम पार्क (Theme Park) मधील 28000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी (Layoff) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांश असल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा राज्यात डिस्नेचे 110,000 कर्मचारी आहेत. या निर्यणानंतर केवळ 82,000 कर्मचारी थीम पार्कमध्ये कामावर राहतील.
‘डिस्नेलँड’च्या चेअरमननी व्यक्त केली दिलगिरी
‘हा निर्णय घेणे खूप कठीण होते. परंतु, कोविड-19 संकटामुळे व्यवसायाचे झालेले नुकसान पाहता हा एकमेव पर्याय आमच्याकडे उरला होता. सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी पर्यटकांची क्षमता मर्यादीत करावी लागणार आहे. तसेच कोरोना व्हायरसचे संकट अजून किती काळ चालेल, याचा अंदाज बांधता येणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे’, अशी माहिती देत डिस्नेचे (Disneyland) चेअरमन जोश डी’अमेरो (Josh D’Amaro) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. (Disneyland Theme Park layoff 28000 employees)
जुलै महिन्याच्या मध्यापासून फ्लोरिडामधील डिस्नेवर्ल्ड (Disneyland) पर्यटकांसाठी काही प्रमाणात सुरु करण्यात आले आहे. परंतु, कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे या थीमपार्कला (Theme Park) भेट देणाऱ्यांच्या संख्येत खूप मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या युनियनसोबत डिस्ने कंपनी चर्चा करणार आहेत.
A statement from Josh D’Amaro, Chairman, Disney Parks, Experiences and Products: https://t.co/EiBnCNBCqd pic.twitter.com/kXF2PH5D13
— Disney Parks News (@DisneyParksNews) September 29, 2020
अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे 7,180,411 रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 2,05,774 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. जगभरात कोरोना विषाणूला प्रतिबंध घालणारी लस तयार करण्याचे काम सुरू आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूवर संशोधन सुरू आहे.
(Disneyland Theme Park layoff 28000 employees)
संबंधित बातम्या :