Diwali 2020 : ‘पदरावर झळकणारा मोर’ आता दारावर, दिवाळीसाठी ‘पैठणी कंदील’ सज्ज
चौकनी नक्षी, फुलांच्या वेली, पदरावर मोर या सर्व पॅटर्नचे पैठणी कंदील सध्या बाजारात उपलब्ध आहेत. (Diwali 2020 Paithani Saree Kandil In Market)
-
-
यंदा दिवाळीवर कोरोनाचं सावट असलं तरी राज्यात अनेक ठिकाणी दिवाळीची जय्यत तयार केली जात आहे.
-
-
यंदा अनेकांचा कल हा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकडे आहे. त्यामुळे सणांच्या या सर्व गोष्टी पर्यावरणपूरक असतील याकडे सर्वजण लक्ष देत आहेत.
-
-
दिवाळी म्हटलं की दिवे, फराळ, रांगोळी आणि घराची शोभा वाढवणारा आकाश कंदील. याशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटत नाही.
-
-
सध्या बाजारात अनेक पर्यावरणपूरक आकाश कंदिलाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
-
-
प्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून कागदी कंदिलांच्या पाठोपाठ आता रेशमी साज असलेले आकाशकंदील दाखल झाले आहेत.
-
-
विशेष म्हणजे लालबागमधील अभिषेक आणि हर्षदा साटम या दाम्पत्याने पैठणी साडीपासून कंदील तयार केले आहेत.
-
-
त्यामुळे आता पदरावर झळकणारा मोर हा प्रत्येकाच्या दारात दिसणार आहे. चौकनी नक्षी, फुलांच्या वेली, पदरावर मोर या सर्व पॅटर्नचे पैठणी कंदील सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
-
-
सध्या जरीच्या कपड्यांच्या कंदीलासह पैठणी कंदीलही लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
-
त्यामुळं यंदा दिवाळी जर पर्यावरणपूरक साजरी करायची असेल तर प्लास्टिक कंदिलाला पैठणी कंदील नक्कीच पर्याय ठरु शकतो.