देशभरात दिवाळीची धूम, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजीटल दिवाळी साजरी करण्याकडे तरुणाईचा कल
देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, करोनाची पार्श्वभूमी तसेच प्रदूषणाचा विचार करुन या वर्षीची दिवाळी फटाके न फोडता साजरी करण्याकडे नागरिकांचा कल दिसतोय.
नवी दिल्ली : देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, करोनाची पार्श्वभूमी तसेच प्रदूषणाचा विचार करुन या वर्षीची दिवाळी फटाके न फोडता साजरी करण्याकडे नागरिकांचा कल दिसतोय. देशातील तरुणांकडून डिजीटल दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. (Diwali celebrated in different way in country, youngsters celebrating digital Diwali)
देशात दिवाळीची धूम आहे. या वर्षीच्या दिवाळीवर कोरोना संसर्गाचं सावट आहे. दीपावली उत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग, कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. महाराष्ट्र, दिल्ली सरकारने राज्यातील नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
Happy #Diwali to you and your family.May the light of the diyas illuminate your home and life with blessings of joy ,prosperity and health. #HappyDiwali2020 pic.twitter.com/8QSECI0gRe
— Maya Kadosh (@MayaKadosh) November 14, 2020
देशात सकाळपासून सोशल मीडियावर दिवाळीच धूम आहे. तरुणाईकडूम फेसबुक, ट्विटरवर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. ट्विटरवर तर #HappyDiwali हा ट्रेन्ड टॉपवर आहे. या ट्रेन्डसोबतच #दीपावली हा ट्रेन्ससुद्धा ट्विटरवर मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या ट्विटर अकाऊंटरवर दिवा लावतानाचे फोटो अपलोड करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आप सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। ? May you be the source of joy & light in someone’s life today. Happy Diwali! pic.twitter.com/HdRhu6nZko
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 14, 2020
मोठ्या-मोठे्या सेलिब्रिटीज आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्याचबरोबर कोरोनासंबंधी योग्य काळजी, पर्यावरणपूर दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांच्याकून केले जात आहे. कुणी आपल्या घरासमोर काढलेल्या रांगोळी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत आहेत. तर कुणी ग्रीन दिवाळी या हॅशटॅगखाली दिवे प्रज्वलीत करुन त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या वर्षी एकमेकांच्या घरी जाण्याचे टाळत, सोशल मीडियाद्वारे दिवाळीचे सेलिब्रेशन होत असल्यामुळे तरुणांमध्ये वेगळ्याच प्रकारचा उत्साह आहे.
?????? May the beauty of the festival of lights?️? fill your home with happiness and may the new times following it bring joy, peace, and prosperity in your life. Wishing you and your family a very Happy Diwali! ?????#HappyDeepavali pic.twitter.com/mxhA5peFj8
— Guerrière (@Reineguerrieree) November 14, 2020
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील आपल्या घरासमोर दिवे लावत, पूजा करत जनतेला प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
Delhi: Defence Minister Rajnath Singh and his family light earthen lamp at their residence on #Diwali pic.twitter.com/rEKQa00Ijk
— ANI (@ANI) November 14, 2020
संबंधित बातम्या :
ग्राहकांची ‘दिवाळी’; काजू-बदामचे दर घसरल्याने सुकामेवा खरेदीसाठी बाजारात गर्दी!
मंदिरं उघडण्याची ‘हीच ती वेळ’, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील
दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब-उपेक्षिताला सामावून घ्या, राज्यपालांकडून जनतेला ‘हॅप्पी दीपावली’
(Diwali celebrated in different way in country, youngsters celebrating digital Diwali)