‘हे’ काम लवकर करा, अन्यथा आज रात्रीपासून टीव्ही बंद होणार
नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे केबल टीव्ही आणि डीटीए चॅनेलसाठीचे नवे नियम उद्या 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीचे 100 चॅनेल्स निवडण्याचा गुरुवार शेवटचा दिवस आहे. त्यासाठी एअरटेल, टाटा स्काय आणि डिश टीव्ही सारख्या डीटीएच प्रोव्हायडर्स आणि केबल ऑपरेटर्सने आपल्या चॅनल्सची यादी आणि पॅकेज जारी केले आहेत. ग्राहकांना यापैकी […]
नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे केबल टीव्ही आणि डीटीए चॅनेलसाठीचे नवे नियम उद्या 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीचे 100 चॅनेल्स निवडण्याचा गुरुवार शेवटचा दिवस आहे. त्यासाठी एअरटेल, टाटा स्काय आणि डिश टीव्ही सारख्या डीटीएच प्रोव्हायडर्स आणि केबल ऑपरेटर्सने आपल्या चॅनल्सची यादी आणि पॅकेज जारी केले आहेत. ग्राहकांना यापैकी 100 चॅनेल निवडावे लागतील. जर तुम्ही आज ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर रात्री 12 वाजेनंतर तुमचे टीव्ही बंद होऊ शकतात, त्यानंतर तुम्हाला तुमचे आवडते कार्यक्रम बघता येणार नाही.
100 चॅनल्सच्या स्लॉटसाठी नेटवर्क कपॅसिटी शुल्क म्हणून 130 रुपये द्यायचे आहेत. यात जर तुम्ही फ्री टू एअर चॅनेल निवडता, तर तुम्हाला कुठलेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. मात्र पेड चॅनल्ससाठी तुम्हाला एक निश्चित शुल्क भरावे लागेल. 100 पेक्षा जास्त चॅनल्स बघायचे असल्यास, पुढील 25 चॅनल्समागे 20 रुपये असे शुल्क भरावे लागेल. तसेच एक एचडी चॅनेल हे दोन एसडी चॅनल इतके असेल. म्हणजेच तुम्ही दोन एसडी चॅनलच्या बदल्यात एक एचडी चॅनल निवडू शकता. याबाबतची अधिक माहिती तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला विचारु शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॅनेल्सला कस्टमाईजही करु शकता.
एका चॅनलचे सबस्क्रिप्शन हे 19 रुपयांपर्यंत असेल. ग्राहक आपल्या इच्छेनुसार चॅनेलची निवड करु शकतात. त्यामुळे त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडरने नेमून दिलेल्या चॅनल्सचे सबस्क्रीप्शन घ्यायची गरज नाही.
डीटीएच प्लॅन कसा निवडावा?
एअरटेल–
एअरटेल ग्राहकांना एअरटेलची अधिकृत वेबसाईट किंवा एअरटेल अॅपच्या मदतीने हा प्लॅन निवडता येईल. यासाठी ग्राहकाला आपला फोन नंबर टाकावा लागेल, त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, या ओटीपीच्या मदतीने तुम्ही लॉग इन करु शकाल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अनेक पॅकेजचे ऑप्शन दिसतील. 100 चॅनेल्सची निवड केल्यानंतर तुम्हाला एकूण किती रुपये भरायचे आहेत त्याची माहिती दिसेल. हे पैसे तुम्हाला दर महिन्याला भरावे लागतील. त्यानंतर तुम्ही हा प्लॅन कन्फर्म करु शकता.
एअरटेल 25 चॅनेल्स मोफत देत आहे. या चॅनेल्सना यादीतून वगळता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही एअरटेलवर चॅनेल्स निवडत असाल तर त्याची सुरुवात 25 पासून होईल. यामध्ये तुम्ही एचडी आणि एसडी चॅनेल्स निवडू शकता.
टाटा स्काय–
टाटा स्कायची प्रोसेसही एअरटेल सारखीच आहे. टाटा स्कायच्या अधिकृत वेबसाईट किंवा अॅपवरुन तुम्ही हे चॅनेल्स निवडू शकता. यासाठी ग्राहकाला आधी आपला मोबाईल किंवा सबस्क्राईबर आयडी टाकत लॉग इन करावं लागेल. यामध्ये तुम्ही टाटा स्काय पॅक किंवा ऑल पॅक निवडू शकता. म्हणजे तुम्ही 100 चॅनेल्स निवडू शकता किंवा महिन्याचे प्लॅन घेऊ शकता. जे 100 चॅनेल्स निवडतील त्यांना जीएसटी पकडून 153 रुपये द्यावे लागतील आणि ज्यांनी जास्त महिन्यांचे प्लॅन निवडले असतील त्यांचे उर्वरीत पैसै आपोआप अॅडजस्ट होऊन जातील.
डिश टीव्ही –
डिश टीव्हीसाठीही ग्राहकाला आधी आपला मोबाईल किंवा सबस्क्राईबर आयडी टाकत लॉग इन करावं लागेल. वेबसाईटवर ग्राहक डिश कॉम्बो, चॅनेल्स किंवा बुके या पैकी एक पर्याय निवडू शकतात. त्यानंतर तुम्हाला भाषा निवडावी लागेल. त्यानंतर आपल्या आवडीनुसार चॅनेल्स निवडू शकता. 100 चॅनेल्स निवडल्यानंतर त्या यादीला कन्फर्म करत पैसे भरावे लागतील. यामध्ये तुम्हाला डीडी चॅनेल्स देण्यात येईल, हे चॅनेल्स तुम्ही वगळू शकत नाही.
गुरुवारी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर, मध्यरात्रीपासून तुमचा टीव्ही बंद होऊ शकतो. त्यानंतर जोपर्यंत तुम्ही ट्रायची ही प्रणाली स्वीकारत नाही तोपर्यंत तुमचा टीव्ही बंद राहणार. पण ज्यांनी महिन्यांचे किंवा वर्षभराचे प्लॅन्स घेतलेले आहेत, त्यांना या समस्येचा सामना करावा लागणार नाही, कारण त्यांचे उर्वरीत पैसे हे बॅलेन्स राहतील आणि पुढे तुम्ही त्यातुनच यासाठीचे शुल्क भरुन टीव्ही रिचार्ज करु शकता.
ही प्रणाली स्वीकारण्याचा आणि आपल्या आवडीचे 100 चॅनेल्स निवडण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे देशभरातील अनेक लोक आपले प्लॅन निवडण्यासाठी या ऑनलाईन सुविधांचा वापर करत आहेत. यामुळे डीटीएच कंपन्याच्या वेबसाईटवरील लोड वाढला आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर डिश टीव्हीची अधिकृत वेबसाईट उघडण्यास बराच वेळ घेत आहे. त्यामुळे तुम्हाला आज हे प्लॅन घेण्यासाठी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
संबंधित बातम्या :
डीटीएच कंपनीची सक्ती नाही, तुमच्या आवडीचा सेट टॉप बॉक्स निवडा