तुम्ही ए – 1 की ए – 2 दूध पिता ? काय आहेत दूधाचे हे प्रकार

आपण दररोज दुध पिणे आरोग्य चांगले रहाते असे आपण ऐकत आलो, परंतू काही जणांना दूध पचत नाही. दूध प्यायल्याने निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांविषयी संशोधन सुरू आहे.

तुम्ही ए - 1 की ए - 2 दूध पिता ? काय आहेत दूधाचे हे प्रकार
milkImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 8:23 AM

मुंबई : आपण लहानपणापासून दूध पिणे ( milk ) शरीरासाठी चांगले असते असे ऐकत आलो आहोत. दूध प्यायल्याने आपल्याला ताकद मिळत असते. शरीराची कॅल्शीयमची ( calcium )  गरज भागवण्यासाठी दूधाची आपल्याला गरज असते. दूध हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. विशेषतः जर आपल्याला मजबूत हाडे आणि दात हवे असतील तर दूध प्यावे असेच म्हटले जाते. परंतू अलीकडे संशोधनात वेगळेत तथ्य समोर आले आहे.संशोधक दूधातील आजारी पाडणाऱ्या घटकांचा अभ्यास करीत आहेत.

सकाळी उठल्यावर आणि झोपताना एक ग्लास दूध पिणे हे चांगल्या आरोग्यदायी सवयीचा भाग मानला जातो. परंतू अलिकडे एका संशोधनात एक अनोखी बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांत काही जणांमध्ये दूध प्यायलानंतर काही आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच, संशोधक दूधातील आजारी पाडणाऱ्या घटकांचा अभ्यास करीत आहेत.

गाईच्या दुधात आढळणाऱ्या ए -1 बीटा-केसिन ( A1-beta-casein) नावाच्या प्रोटीनच्या अंशामुळे हे दुध प्यायल्याने काही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. या ए -1 बीटा-कासिन प्रथिनामुळे आपल्याला सर्दी, सायनस, कंजेशन, थकवा, जळजळ, शरीरात जडपणा, टाइप – 2 मधुमेह, ऑटिझम आणि इतर न्यूरोलॉजिकल समस्यां उद्भवण्याचा धोका असतो असे ,” डायटेशियन अंजली मुखर्जी यांनी म्हटले आहे.

ए-1 आणि ए – 2 म्हणजे काय ? 

सामान्य गायीच्या दूधात ए-1 आणि ए – 2 असे दोन प्रकारचे बीटा कासिन असते. ए-1 दूध सामान्य गायीचे दूध असते. तर ए – 2 दूध विविध गायींच्या दूधापासून खास तयार केले जात असून ते ब्रँडेड असते. ए – 2 दूधात बीटा कासिन नसते. सामान्य गायीच्या दूधात ए-1 आणि ए – 2 असे दोन प्रकारचे बीटा कासिन असते. बाजारात उशीरापर्यंत विक्री होत असलेल्या ए- २ दूधात ए – २  बीटा कासिन हा घटक असतो आणि उत्परिवर्तित ए-१ बीटा-कासिन नसतो. 

ए- 1 बीटा-कासिन हा ए- 2 कासीन पेक्षा जास्त हानिकारक आहे का ? यावर संशोधन सुरू असल्याचे आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी म्हटले आहे. A – 1 आणि A – 2 दुधात लॅक्टोजचे प्रमाण सारखे असले तरी A – 2 दुधाचे सेवन केल्यावर लोकांमध्ये गॅस्ट्रीक प्रॉब्लेमची लक्षणे कमी दिसली आहेत. 

सध्या पुढे आलेले पुरावे अजून अपुरे आणि अनिर्णित आहेत. परंतू दूधामध्ये आढळणारा बीटा-कॅसोमॉर्फिन -7 (BCM-7) नावाचा पेप्टाइड सोडतो त्यामुळे आतड्यात जळजळ होते आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात असे गरिमा गोयल यांनी इंडीयन एक्सप्रेसला सांगितले आहे.

ए -1 बीटा-केसिनला टाइप- 1 मधुमेहाशी जोडत ​​संशोधकांनी एक निष्कर्ष काढला आहे. तो म्हणजे लहानपणी ए- 1 दुधाचे सेवन केल्याने टाईप – 1  मधुमेहाचा धोका वाढतो असे अभ्यासात पुढे आले आहे. हा अभ्यास केवळ निरीक्षणात्मक आहे, त्यामुळे ए -1 कासीन हा मुख्य घटक हानीकारक असल्याचा निष्कर्ष आताच काढणे घाईचे ठरेल असे म्हटले जात आहे. तर ए – 2 दूधात मात्र उत्प्रेरीत ए – 1 बिटा कासीन नसल्याने ते दूध आरोग्यदायी असल्याचे म्हटले जात आहे,

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.