नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या चांदवड तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा हैदास वाढला आहे. चांदवड तालुक्यात राहणाऱ्या एका 9 वर्षीय मुलावर काही दिवसांपूर्वी कुत्र्यांनी हल्ला चढवला होता. अनिकेत सोनवणे असे या मुलाचे नाव आहे. या हल्ल्यात अनिकेत गंभीर जखमी झाला असून, त्याला त्याचा पाय गमवावा लागला आहे. गेल्या 20 दिवसांपासून तो नाशिकच्या अपोलो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. (Dog Attack on 9 Year Old Boy In Nashik)
नाशिकमधील चांदवड तालुक्यात दुर्गाव या गावात अनिकेत राहतो. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. अनिकेत काही दिवसांपूर्वी सकाळी आपल्या वस्तीजवळ मळ्यात खेळत होता. खेळत असतानाच अचानक 10 ते 15 भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्याने कुत्र्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वच कुत्रे अनिकेतच्या अंगावर तुटून पडले आणि त्याच्यावर हल्ला करु लागले.
मात्र त्याच्या आवाजाने आजूबाजूचे शेजारी त्या ठिकाणी धावत आला. त्यांनी त्या सर्व कुत्र्यांना पळवून लावलं. मात्र तोपर्यंत त्या कुत्र्यांनी अनिकेतच्या संपूर्ण अंगावर जखमा केल्या होत्या. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. यानंतर शेजारच्या नागरिकांना अनिकेतला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवलं, मात्र तोपर्यंत तो बेशद्ध झाला. त्याच्यावर जवळच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्याच्यावर आतापर्यंत 7 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यात त्याचा पाय पूर्णपणे निकामी झाल्याने त्याचा पाय पूर्ण काढावा लागला. अजूनही त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. कारण त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत. मात्र तो उपचाराला प्रतिसाद देत असल्याने यातून वाचला आहे.
शहरातील भटके कुत्रे पकडून ग्रामीण भागात सोडले जातात. त्यामुळे हे कुत्रे थेट हल्ला करतात. त्यामुळे प्रशासनाने जर अशा कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर आज ही वेळ माझ्या मुलावर आली नसती, अशी प्रतिक्रिया अनिकेतचे वडील सोपान सोनवणे यांनी दिली.
भटक्या कुत्र्यांनी अनेकांवर आतापर्यंत हल्ले केले आहेत. मात्र तरीही प्रशासन त्यांचा बंदोबस्त करत नाही. जर बंदोबस्त केला असता तर आज इतक्या लहान वयात अनिकेतला आपला पाय गमवावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य देत आहेत. (Dog Attack on 9 Year Old Boy In Nashik)
संबंधित बातम्या :
दिवाळीसाठी आलेल्या पाहुण्याची हजार रुपयांसाठी हत्या, चोरट्याला अटक
उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला, चोरटा गजाआड