Marathi News Latest news Dombivli choreographer avinash payel teaches dance therapy to thane covid hospital patients
कोरोनाग्रस्तांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण, ठाणे कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तरुणाचा ‘नृत्यानंद’
डोंबिवलीत राहणारा कोरिओग्राफर अविनाश पायलने ठाणे कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना डान्स शिकवून नवी ऊर्जा दिली
ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या सहकार्याने अविनाशने बाळकुमच्या ठाणे कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत डान्स सेशन आयोजित केले. त्यांना नृत्याचे धडे देऊन चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला.
Follow us on
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना मानसिक बळ देण्यासाठी अनेक ठिकाणी विरंगुळ्याचे प्रयत्न होताना दिसतात. ठाण्यातील कोव्हिड हॉस्पिटलमध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी अशाच फन अॅक्टिव्हिटी आयोजित करण्यात आल्या होत्या.

कोरोनाग्रस्तांना अनेक दात्यांकडून होणारी मदत पाहून मला प्रेरणा मिळाली, पण फक्त आर्थिक हातभार लावून उपयोग नाही, तर रुग्णांची मानसिक अवस्था सुधारण्यासाठी कलाकार म्हणून प्रयत्न करावेत, असं आपल्याला वाटल्याचं अविनाश म्हणाले.
ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या सहकार्याने अविनाशने बाळकुमच्या ठाणे कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत डान्स सेशन आयोजित केले. त्यांना नृत्याचे धडे देऊन चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला.
आधी आपल्यालाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती मला सतावत होती, मात्र रुग्णालयात कमालीची स्वच्छता पाळली जाते. तुम्ही आनंदी असता तेव्हा औषधांचे परिणाम अधिक सकारात्मक होतात. आनंद देण्याचे माध्यम म्हणजे संगीत आणि नृत्य हे असते, अशा भावना अविनाशने बोलून दाखवल्या.