“डॉनला कोरोनाने पकडलंय, घरात थांबा, उगाच डॉन बनू नका”, नगरपालिकेची अनोखी जाहिरात

उस्मानाबादमध्ये घराबाहेर पडणाऱ्या अतिशाहण्यांना नगरपालिकेने एका अनोख्या पोस्टरमधून घरातच थांबण्याचा सल्ला दिलाय (Don Amitabh Bachchan Corona Awareness).

डॉनला कोरोनाने पकडलंय, घरात थांबा, उगाच डॉन बनू नका, नगरपालिकेची अनोखी जाहिरात
Follow us
| Updated on: Jul 18, 2020 | 7:26 PM

उस्मानाबाद : राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक सरकारी यंत्रणा कोरोना नियंत्रण आणि जनजागृतीवर मोठा भर देताना दिसत आहेत. जनजागृतीसाठी काही नगरपालिकांनी भन्नाट कल्पना राबवून लोकांपर्यंत संदेश दिला आहे. असंच एक उदाहरण उस्मानाबादमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाची पर्वा न करता घराबाहेर पडणाऱ्या अतिशाहण्यांना नगरपालिकेने एका अनोख्या पोस्टरमधून घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे (Don Amitabh Bachchan Corona Awareness). यासाठी थेट बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनाही कोरोना झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

उस्मानाबादमधील लोहारा नगरपालिकेने अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘डॉन’चा लोकप्रिय डायलॉग वापरुन हे पोस्टर तयार केलं आहे. या पोस्टरवर लिहिलं आहे, “ज्या डॉनला पकडणे मुश्कीलच नाही तर नामुमकीन होते, त्याच डॉनला कोरोनानं पकडलंय. आपणही आपल्या परिवारासाठी घरीच थांबा. उगाच डॉन बनू नका.” या पोस्टरवर अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटाचं बॅनरही लावलं आहे. सोबतच कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याच्या सूचनाही लिहिण्यात आल्या आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

विशेष म्हणजे हे पोस्टर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया येत आहे. काही लोक बाहेर पडणाऱ्या अतिशहाण्यांवर निशाणा साधत टोले लगावत आहेत. तर काही जण नगरपालिकेच्या या कल्पकतेचं कौतुक करत आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या कोरोना संसर्गाची मोठी बातमी झाली. अजूनही त्यांच्या प्रकृतीबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. त्याचे चाहते देखील काळजी करत आहेत. याचाच उपयोग करुन लोहारा नगरपालिकेने लोकांमध्ये खबरदारी घेण्याचा संदेश देण्यासाठी केला आहे.

हेही वाचा :

नाशिकमध्ये आईला कोरोना झाल्याचं कळताच मुलाची आत्महत्या

प्रत्येकाच्या मागे मी पोलीस लावू शकत नाही, डॉक्टर-व्यापाऱ्यांच्या बाचाबाचीनंतर औरंगाबादचे आयुक्त संतप्त

आधी मिशन धारावी, आता ध्येय पुणे, पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी इक्बाल सिंह चहल यांची मदत

Don Amitabh Bachchan Corona Awareness

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.