पनवेलचा कुख्यात डॉन राजा कैकाडीला खंडणीप्रकरणी अटक, मेड इन USA पिस्तूल जप्त

करंजाडे येथील व्यावसायिकाला खंडणी तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली राजा कैकाडीला अटक करण्यात आली आहे. (Don Raja Kaikadi of Panvel, has been arrested by Panvel Police)

पनवेलचा कुख्यात डॉन राजा कैकाडीला खंडणीप्रकरणी अटक, मेड इन USA पिस्तूल जप्त
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 9:13 PM

पनवेल : गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रीय असलेल्या पनवेलचा (Panvel) कुख्यात डॉन राजा कैकाडीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. करंजाडे येथील व्यावसायिकाला खंडणी तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. (Don Raja Kaikadi of Panvel, has been arrested by Panvel Police)

करंजाडे येथील तक्रारदाराचा बांधकाम सामग्री विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यावसायिकाने राजा कैकाडीने खंंडणी मागितल्याची पनवेल पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, राजा कैकाडी त्याला व्यवसाय करु देत नव्हता. तसेच, पैसे दे अन्यथा व्यवसाय करु देणार नाही, असे म्हणत सतत धमकावत होता. धमकीला न बधल्याने राजा कैकाडीने व्यावसायिकाला पिस्तूल दाखवत त्याला जिवे मारण्याचीही धमकी दिली.

राजा कैकाडीकडे मेड ईन USA पिस्तुल व्यवसायिकाच्या तक्रारीची दखल घेत पनवेल पोलिसांनी बुधवारी (7 ऑक्टोबर) रात्री 2 च्या सुमारास सापळा रचत राजा कैकाडीला अटक केली. त्याच्या राहत्या घरावर धाड टाकल्यानंतर राजा कैकाडी पोलिसांना सापडला. यावेळी राजा कैकाडीकडे 25 हजार रुपये किमतीचे मेड इन USA असलेले पिस्तूल सापडले. तसेच काही आक्षेपार्ह वस्तूही पोलिसांनी त्याच्या घरातून हस्तगत केल्या आहेत. राजाची पनवेल पोलिसांनी कसून चौकशी केली असून तो अनेक गंभीर गुन्ह्यांत सामील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच त्याच्या चौकशीतून अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यताही पनवेल पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या राजा कैकाडीची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, राजा कैकाडीची अटक मोहीम पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस अधिकारी राहुल सोनावणे, निलेश राजपूत, राजेंद्र जाधव, यांनी आरोपी राजेश कैकाडी याचा शोध घेतला. अशा प्रकारच्या कुख्यात आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी धमकी किंवा खंडणीचे प्रकार घडल्यास नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे सांगितले आहे. तसेच अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या  :

अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी, 35 कोटींची मागणी

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे खंडणीची मागणी, चंद्रकांत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

धुळ्यात ‘स्पेशल 26’, भुजबळांच्या नावावर रेशन दुकानदाराकडून दोन लाखांच्या खंडणीची मागणी

(Don Raja Kaikadi of Panvel, has been arrested by Panvel Police)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.