अमेरिकेत 1 नोव्हेंबरपासून कोरोना लस वाटपासाठी तयारी करा, ट्रम्प सरकारचे राज्यांना सूचना

अमेरिकेतील डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सेंटरने (सीडीसी) अमेरिकेतील राज्यांना 1 नोव्हेंबरपासून कोरोना लस वाटपाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत (Distribution of Corona Vaccine in America).

अमेरिकेत 1 नोव्हेंबरपासून कोरोना लस वाटपासाठी तयारी करा, ट्रम्प सरकारचे राज्यांना सूचना
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 7:45 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेतील डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सेंटरने (सीडीसी) अमेरिकेतील राज्यांना 1 नोव्हेंबरपासून कोरोना लस वाटपाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत (Distribution of Corona Vaccine in America). कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर तातडीने वितरण करण्याची व्यवस्था सज्ज असावी यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. ट्रम्प सरकारने अमेरिकेतील आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी कोरोना लस उपलब्ध करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. या निवडणुकीत कोरोनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याने हे प्रयत्न केले जात असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेच्या कोरोना लस से कहा है कि वे एक नंवबर यानी राष्ट्रपति चुनाव से ठीक दो दिन पहले तक संभवति कोरोनावायरस वैक्सीन के डिस्ट्रीब्यूशन के लिए तैयार हो जाएं.

सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी 27 ऑगस्टला अमेरिकेतील सर्व राज्यांच्या गव्हर्नरला पाठवलेल्या पत्रात आगामी काळात अमेरिकेतील सर्व राज्यांना मॅककेसन कॉर्पकडून परवाना अर्ज मिळतील असं म्हटलं आहे. मॅककेसन कॉर्पने राज्ये, स्थानिक आरोग्य विभाग आणि रुग्णालयांसह इतर ठिकाणी लशीच्या वितरणासाठी सीडीसीसोबत करार केला आहे.

रेडफील्ड म्हणाले, “सीडीसी कोरोना लस वितरणाची व्यवस्था उभी करण्यात गती आणण्यासाठी सहकार्याची विनंती करते. ही व्यवस्था उभी करण्यासाठी आवश्यक गोष्टींची उपलब्धता करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. ही सर्व तयारी 1 नोव्हेंबर 2020 पर्यंत पूर्ण व्हावी. लशीच्या सुरक्षेबाबत किंवा तिच्या शरीरावरील परिणामाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” याशिवाय सीडीसीने काही आरोग्य विभागांना तीन नियोजन दस्तावेज देखील पाठवले आहेत. यात लस कधी उपलब्ध होणार याची संभाव्य तारिख सांगण्यात आली आहे.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये सर्वात आधी या दस्तावेजांबाबत माहिती समोर आली. यात ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत लस उपलब्ध होऊ शकते असा अंदाज सांगण्यात आला आहे. दुसऱ्या एका दस्तावेजात कोव्हिड 19 च्या मर्यादीत संख्येतील लस नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध होईल आणि हा लशीचा पुरवठा 2021 पर्यंत खूप प्रमाणात वाढेल, असं नमूद करण्यात आलं आहे.

यात असंही म्हटलं आहे की सुरुवातीला उपलब्ध लस फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनकडून (एफडीए) मंजूर केली जाईल किंवा आणीबाणीशी संबंधित विभागाकडून याच्या वितरणावर निर्णय घेतला जाईल. यात कोणत्या समुहाला आधी लस द्यायची याचा निर्णय घेण्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. अशा गरजुंची यादी करुन ती लस देण्याची व्यवस्था उभी करण्याबाबत पावलं उचलण्यास सांगण्यात आले.

संबंधित बातम्या :

US Election | कोरोनाच्या लसीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून?

Distribution of Corona Vaccine in America

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.