जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमवर मोदी-ट्रम्पचे भाषण, 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमवर मोदी आणि ट्रम्पचे भाषण होणार (Donald Trump Motera Stadium India Tour) आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आजपासून (24 फेब्रुवारी) दोन दिवसीय भारत दौऱ्यावर (Donald Trump Motera Stadium India Tour) आहेत. ट्रम्पच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने खास तयारी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरही भारत दौऱ्यावर आहे.
सकाळी अहमदाबादला पोहोचल्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास मोटेरा स्टेडिअमवर मोदी आणि ट्रम्प यांचे भाषण होईल. यासाठी गुजरातचे मोटेरा स्टेडिअम सज्ज झालं आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमवर मोदी आणि ट्रम्पचे भाषण होणार आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने मोटेरा स्टेडिअमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हे जगातील सर्वात मोठे स्टेडिअम असल्याचा बीसीसीआयने दावा केला (Donald Trump Motera Stadium India Tour) होता.
#MoteraStadium Ahmedabad, India ?? Seating capacity of more than 1,10,000 World’s largest #Cricket stadium pic.twitter.com/FKUhhS0HK5
— BCCI (@BCCI) February 18, 2020
मोटेरा स्टेडिअम हे पूर्णपणे नव्याने बांधण्यात आले आहे. यात 1 लाख 10 हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्टेडिअमचा इतिहास जुना आहे. मोटेरा स्टेडिअम बनवण्यासाठी गुजरात सरकारने 50 एकरची जमीन दान दिली होती. त्यानंतर 1982 मध्ये मोटेरा स्टेडिअम बनवण्यात आले. त्यानंतर 1983 नंतर या स्टेडिअमवर क्रिकेटचे सामने होत होते.
मात्र 2015 मध्ये हे स्टेडिअमचे रुपडं पालटण्यासाठी या ठिकाणी क्रिकेटचे सामन्याचे आयोजन रोखण्यात आले. या स्टेडिअमला पूर्णपणे नव रुप देण्यात आले आहे. यासाठी 750 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या स्टेडिअमला नवे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 4 वर्षांहून अधिक कालावधी लागला.
The Sun is out! ?#MoteraStadium Ahmedabad, India ?? pic.twitter.com/JYAC886Bd4
— BCCI (@BCCI) February 19, 2020
मोटेरो स्टेडिअमच्या पूर्वी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडिअम सर्वात मोठे मानले जाते. मेलबर्न क्रिकेट स्टेडिअममध्ये जवळपास 1 लाख लोकांची बसण्याची क्षमता आहे. मात्र मोटेरा स्टेडिअममधून जवळपास 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात. त्यामुळे हे जगातील सर्वाधिक क्षमतेचे मैदान असेल असा दावा केला जात (Donald Trump Motera Stadium India Tour) आहे.
Gujarat: Motera Stadium in Ahmedabad, where Prime Minister Narendra Modi and US President Donald Trump will speak at the ‘Namaste Trump’ event later today. pic.twitter.com/KgNggBCOLl
— ANI (@ANI) February 24, 2020
मोटेरा क्रिकेट स्टेडिअमचे रुपडे पालटल्यानंतर अद्याप यावर कोणतीही क्रिकेट सामना खेळण्यात आलेला नाही. या क्रिकेट स्टेडिअममध्ये सर्व आधुनिक सोयी-सुविधा आहेत. यात 11 वेगवेगळ्या खेळपट्टी तयार करण्यात आल्या आहेत. तसेच पाऊस पडल्यानंतर केवळ अर्धा तासात स्टेडिअममधून साचलेले पाणी बाहेर काढण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. या स्टेडिअममध्ये 3 हजार गाड्या आणि 10 हजार टू-व्हिलर पार्क करता येणार आहेत.
(Donald Trump Motera Stadium India Tour)