‘बाटली बंद’ पाणी बिनधास्त पिताय…सावधान, संशोधकांच्या दाव्याने खळबळ
बाटली बंद पाणी तुम्ही बिनधास्त पित असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण या पाण्याचा शुद्धतेचा दावा पोकळ असल्याचे संशोधनात आढळले आहे.
आपण प्रवासात हल्ली बाटली बंद पाणी शुद्ध असल्याचे समजून बिनधास्त पित असतो. परंतू अलिकडे झालेल्या संशोधनात बाटली बंद पाणी सुरक्षित नसल्याचे उघडकीस आलेले आहे. एका संशोधनात सरासरी एका लिटर बाटली बंद पाण्यात २,४०,००० प्लास्टीकचे कण आढळतात. हा आकडा खूपच भयानक आहे. कारण नळाच्या एक लिटर पाण्यात सरासरी ५.५ टक्के प्लास्टीक कण आढळतात. नॅनो प्लास्टीकमुळे कॅन्सर, जन्म दोष आणि प्रजनन सारख्या समस्यांशी संबंध जोडाला जातो. नॅनो प्लास्टीक आपल्या छोट्या आकारामुळे खतरनाक असतात. त्यामुळे ते सरळ रक्ताच्या पेशीत आणि मेंदूत शिरकाव करतात.
बाटल्यांना तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक सर्वसामान्यपणे थॅलेट्स असते. ते विविध शारीरिक समस्यांना निमंत्रण देते. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सच्या मते थॅलेट्स हे विकासात्मक,प्रजनन, मस्तिष्क , प्रतिरक्षा आणि अन्य समस्यांशी निगडीत असतात. पॉलियामाईड नावाचा एक प्रकारचा नायलॉन पाण्याच्या बॉटलमध्ये आढळणारा प्लास्टीक कण आहे.
अलिकडे झालेल्या संशोधनात आश्चर्यजनक रहस्य उलगडले. एका लिटर पाण्यात सुमारे २,४०,००० प्लास्टीकचे कण आढळले. सामान्यत: तुम्ही एका लिटर पाण्याच्या बाटलीतून पाणी पित असाल तर तुम्ही प्लास्टीकचे तुकडे पित आहात. त्यामुळे हे प्लास्टीकचे कण तुमच्या पोटात जात असतील.
आपल्या बदलत्या जीवनशैलीने आपल्या दैनदिन जीवनात आपण प्लास्टीकच्या खूपच आहारी गेलो आहोत. घर असो वा ऑफीस प्लास्टीकच्या बाटलीतून पाणी पिणे आपण खूपच पसंद करतो.जर तुम्ही असे करत असाल तर सावधान कारण हे स्लो पॉयझन तुम्ही पित आहात असे संशोधकांनी म्हटले आहे.
‘प्रोसिंडिंग्स ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्स’ नावाच्या संस्थेने एका अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष काढला आहे. या म्हटले आहे की एक लिटर प्लास्टीक बॉटलमध्ये सुमारे २.४० लाख प्लास्टिकचे सुक्ष्म तुकडे असतात. त्याने आरोग्यावर गंभीर आणि धोकादायक परिणाम होऊ शकतात.’प्रोसिंडिंग्स ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्स’ संस्थेच्या मते प्लास्टीक बाटलीतून पाणी प्यायल्याने अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात.
काय संशोधन झाले आहे
अलिकडे झालेल्या काही संशोधनात बाटली बंद पाण्यात १,००,००० हून अधिक नॅनोप्लास्टीक आढळतात. हे कण इतके सुक्ष्म असतात की रक्ताचे सर्क्युलेशन खराब करु शकतात. हे मेंदू आणि पेशींना देखील धोका पोहचवू शकतात.
प्लास्टीकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने होणारे आजार
हॉवर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधनानुसार पॉली कार्बोनेटच्या बाटलीत पाण्यात बिस्फेनॉल ए केमिकल असते. ते शरीरात जाते तेव्हा हृदयाचे आजार आणि डायबिटीजचा धोका अनेक पटीने वाढतो.