इचकरंजीत दारुच्या नशेत मित्राला दगडाने ठेचले, क्षुल्लक कारणावरुन मित्राकडून मित्राची हत्या

मयत राजू जाधव हा गवंडी व्यावसाय करत होता. त्याच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (Drunken friend was stoned to death, incident took place at a liquor shop in ichalkaranji)

इचकरंजीत दारुच्या नशेत मित्राला दगडाने ठेचले, क्षुल्लक कारणावरुन मित्राकडून मित्राची हत्या
15 दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका, भररस्त्यात दगडाने ठेचून हत्या
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 4:43 PM

इचलकरंजी : दारुच्या नशेत वादावादी झाल्याने मिञाने मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज दुपारी हातकणंगले तालुक्यात घडली. राजू वसंत जाधव(34) असे मयत तरुणाचे नाव आहे. हातकणंगले तालुक्यातील मजले गावाच्या हद्दीत हातकणंगले कुंभोज रोडवर सागर सदाशिव सनदी यांची शेती आहे. त्यालगत खडी मिक्सर प्लँटजवळ हातकणंगले पोलिसांच्या आशिर्वादाने गेली 10 ते 12 वर्षांपासून एक महिला बेकायदेशीर गावठी दारु अड्डा चालवत होती. मोठ्या संख्येने ग्राहक येथे येत असतात. (Drunken friend was stoned to death, incident took place at a liquor shop in ichalkaranji)

अज्ञात कारणावरुन झाला वाद

नेहमीप्रमाणे शिवपुरी इथला राजू वसंत जाधव हा एका मिञाबरोबर या दारु आड्यावर गेला होता. दुपारी दोनच्या दरम्यान या दोघात अज्ञात कारणावरुन वाद सुरु झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. मिञाने राजू जाधव याच्या डोक्यात दगडाने घाव घातला. त्याचबरोबर तोंडावर वार करुन त्याला ठार केले. या घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी रामेश्वर वैंजाने यांनी घटनास्थळी भेट देऊन सूचना केल्या. संशयित दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत राजू जाधव हा गवंडी व्यावसाय करत होता. त्याच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

वरिष्ठांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी

सनदी मळ्याजवळ हातकणंगले पोलिसांच्या आशिर्वादाने ही महिला बेकायदेशीर गावठी दारु अड्डा चालवत आहे. नागरी वस्तीपासून लांब असल्याने ग्राहकही मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. येथे पोलिसांचा राबता असल्याने नागरिकांची मुजोरी वाढली आहे. येथे अनेकदा हाणामारी सारखे प्रसंग उद्भभवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून अवैध व्यवसाय आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. (Drunken friend was stoned to death, incident took place at a liquor shop in ichalkaranji)

इतर बातम्या

जनतेला दाखवण्यासाठी ग्लोबल टेंडरचा फार्स सुरु आहे का? दरेकरांचा ठाकरेंना सवाल

ट्रेनच्या तिकिटावर लिहिलेल्या पीएनआर क्रमांकाचा फुल फॉर्म काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.