Ducati Multistrada 950s चं नवीन व्हर्जन लाँच, किंमत फक्त…

इटलीची सुपरबाईक कंपनी डुकाटीने भारतीय बाजारात 'मल्टीस्ट्राडा 950 एस'चं पूर्णपणे नवं व्हर्जन लाँच केलं आहे.

Ducati Multistrada 950s चं नवीन व्हर्जन लाँच, किंमत फक्त...
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 12:26 PM

मुंबई : इटलीची सुपरबाईक कंपनी डुकाटीने (Ducati) भारतीय बाजारात ‘मल्टीस्ट्राडा 950 एस’चं (Ducati Multistrada 950s) पूर्णपणे नवं व्हर्जन लाँच केलं आहे. या बाईकची शोरूम किंमत 15.49 लाख रुपये आहे. कंपनीने याबाबत सांगितलं आहे की, या नव्या डुकाटी मल्टीस्ट्राडा 950s बाईकमध्ये 937 सीसीचं इंजिन आहे. या बाईकमध्ये अनेक नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवी बाईक अधिक सुरक्षित करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून काही बदल केले आहेत. (Ducati Multistrada 950s launched in India)

डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विपुल चंद्रा याबाबत म्हणाले की, “मल्टीस्ट्राडा भारतीय बाजारात खूप लोकप्रिय आहे. लाँग राईड करणाऱ्यांची या बाईकला अधिक पसंती आहे. मल्टीस्ट्राडा 950 एसद्वारे तुमची लाँग राईड अधिक शानदार होईल आणि तुम्ही वेगवेगळ्या जागांना भेटी देऊ शकता.

नवीन डुकाटी मल्टीस्ट्राडा 950 एसमध्ये 937 सीसीचं एल-ट्विन, लिक्विड-कुल्ड इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनमध्ये 111 bhp पिक पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. सोबतच या बाईकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे.

मल्टीस्ट्राडा 950S चे फिचर्स

मल्टीस्ट्राडा 950S मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काही बदल केले आहेत. यामध्ये फुल्ल-LED हेडलाईट, 5-इंचांचा फुल्ल कलर टीएफटी डिस्प्ले, बॅकलिट हँडलबार कंट्रोल, हँड्स-फ्री सिस्टिम, रायडर नेव्हिगेशन, क्विक-शिफ्टर आणि क्रूज कंट्रोलसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

या बाईकच्या इलेक्ट्रॉनिक पॅकेजमध्ये Bosch कॉर्नरिंग ABS, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, व्हेईकल होल्ड कंट्रोल, सेमी-अॅक्टिव्ह डुकाटी स्कायहुक सस्पेन्शन, डुकाटी क्विक शिफ्ट अप/डाउन, डुकाटी कॉर्नरिंग लाईटसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

जगातील पहिली Flying Car चालवण्यास परवानगी, किंमत फक्त…

MG Motors च्या ‘या’ SUV ची मार्केटमध्ये धुम, तीन आठवड्यात रेकॉर्डब्रेक विक्री, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

अवघ्या नऊ महिन्यात ‘या’ SUV चे सर्व युनिट्स विकले; जाणून घ्या कारची किंमत आणि फिचर्स

ठरलं! रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित Meteor 350 लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Ducati Multistrada 950s launched in India; check out price specs and features)

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.