मराठवाड्यात पर्यटन व्यवसाय ठप्प, 500 कोटींचा फटका

मराठवाड्यातील पर्यटनस्थळं बंद असल्याने एकूण 500 कोटींच्या महसुलावर शासनाला पाणी सोडावं लागलं आहे. (Due to closure of tourist places in Corona pandemic jobs and revenue lost In Marathwada)

मराठवाड्यात पर्यटन व्यवसाय ठप्प, 500 कोटींचा फटका
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 12:54 PM

औरंगाबाद : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मराठवाड्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील पर्यटनस्थळं (tourist places) बंद असल्याने एकूण 500 कोटींच्या महसुलावर शासनाला पाणी सोडावं लागलं असून, पाच हजार लोकांचा रोजगार बुडाल्याचंही समोर आलं आहे. (Due to closure of tourist places in Corona pandemic jobs and revenue lost In Marathwada)

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद( Aurangabad) शहरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. वेरूळ-अजिंठा, बीबी का मकबरासारखी महत्त्वाची पर्यटनस्थळं बघण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक औरंगाबादेत येतात. पण कोरोनामुळे पर्यटनस्थळेच बंद असल्याने पर्यटकांनीही औरंगाबादकडे पाठ फिरवली आहे. परिणामी सरकारला 500 कोटींचा फटका बसला आहे. तसेच पर्यटनावर आधारित व्यवसाय करणाऱ्या 5000 लोकांचे व्यवसाही बुडाले असून, त्यांच्यासमोर चरितार्थाचे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

जगभरातून पर्यटक येत असल्याने, हॉटेल व्यसायाय(Hotel business)  तसेच ट्रॅव्हल्स कंपन्यांचंही (travel companies) मोठं जाळं औरंगाबादेत पसरलेलं आहे. पण पर्यटकच नसल्याने हॉटेल व्यवसाय चालवावा तरी असा? प्रश्न हॉटेलच्या मालकांना पडलाय. पर्यटनस्थळं बंद असल्याने हॉटेल व्यवसायावर अवकळा आल्याचं पाहायला मिळतंय. आर्थिक उलाढाल होत नसल्याने हॉटेलच्या मालकांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे प्रकारही घडले आहेत. तर छोटे व्यावसायिक, गाईड्स यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही प्रवासी नसल्याने, फेऱ्या कमी केल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, पर्यटनस्थळं बंद असल्याने एकीकडे पर्यटनप्रेमींमध्ये नाराजी आहे. तर व्यवसाय बुडत असल्याने मराठवाड्यातील पर्यटनस्थळं अटी-शर्थींसह सुरु करावीत, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. “कोरोनामुळे आमचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत, तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळं लवकर खुली करावीत” अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘कलम 144’ लागू, सामूहिक पर्यटनाला बंदी

World Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल, पर्यटन दिनी मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट

World Tourism Day | जागतिक पर्यटन दिन का साजरा करतात? यंदाची संकल्पना काय?

पर्यटन बंदीतही नियम चुकवत थेट ‘वाशी टू लोणावळा’ रिक्षाने प्रवास, सात जण ताब्यात

Konkan Beach Shacks | आदित्य ठाकरेंचा पुढाकार, गोव्याची मजा कोकणात, बीच शॅक्सने स्थानिकांना 80 टक्के रोजगार

Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील पर्यटनस्थळाकडे पर्यटकांची पाठ

(Due to closure of tourist places in Corona pandemic jobs and revenue lost In Marathwada)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.