दिल्ली शेतकरी आंदोलन : राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर चौटाला यांचा आश्चर्यजनक दावा, म्हणाले…

मी केंद्रीय मंत्र्यांसमवेत शेतकरी आंदोलनावर, त्यांच्या मागण्यांवर केंद्रीय मंत्र्यांबरोबर चर्चा केली. मला आशा आहे की चर्चेद्वारे प्रश्न सोडवला जाईल. केंद्र सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया चौटाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दिल्ली शेतकरी आंदोलन : राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर चौटाला यांचा आश्चर्यजनक दावा, म्हणाले...
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 7:52 AM

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यतसिंह चौटाला यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर चौटाला यांनी आश्चर्यजनक दावा केला.  केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी येत्या 24 ते 48 तासांत सरकारशी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले. (Dushyant Chautala Meet Rajnath Singh And Said deadlock With Farmer Will Be resolved in 48 hours)

दुष्यांत सिंह चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी पक्षाची ओळख ही शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राहिलेली आहे. याच कारणामुळे शेतकऱ्यांना एमएसपी मिळाली नाही तर राजीनामा देईन, असा इशारा चौटाला यांनी दिला होता. शनिवारी चौटाला यांनी कृषीमंत्री नरेंद्रसिंह तौमर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी आपला नूर पालटत ‘केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी येत्या 24 ते 48 तासांत सरकारशी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची अपेक्षा आहे’, असं मत मांडलं.

शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. मी केंद्रीय मंत्र्यांसमवेत शेतकरी आंदोलनावर, त्यांच्या मागण्यांवर केंद्रीय मंत्र्यांबरोबर चर्चा केली. मला आशा आहे की चर्चेद्वारे प्रश्न सोडवला जाईल. केंद्र सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया चौटाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

शनिवारी झालेल्या आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत संयुक्त शेतकरी चळवळीचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू म्हणाले, “आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्ता दिल्लीत चार पॉइंटरवर आमचे आंदोलन सुरु आहे. 13 डिसेंबर रोजी राजस्थान बॉर्डरवर हजारो शेतकरी ट्रॅक्टर मार्च काढतील आणि दिल्ली जयपूर महामार्ग बंद करतील”.

संयुक्त किसान आंदोलनाचे नेते म्हणाले, “14 डिसेंबर रोजी संपूर्ण देशाच्या डीसी कार्यालयात आमचं निषेध आंदोलन असेल. आमचे प्रतिनिधी 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत उपोषणास बसतील. आमच्या मागण्या म्हणजे केंद्राने पारित केलेले 3 कायदे रद्द करावेत. आम्ही सरकारशी बोलण्यास तयार आहोत. हे 3 कायदे रद्द होईपर्यंत चौथ्या मागणीकडे आम्ही जाणार नाही”.

शेतकरी आंदोलन आणि हरियाणा सरकारचा संबंध

महाराष्ट्र विधानसभेबरोबरच 2019 साली हरयाणाचीही निवडणूक पार पडली. हरयाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यामध्ये भाजपने 40 तर काँग्रेसने 31 जागा जिंकल्या. शेवटी किंगमेकरची भूमिका दुष्यतसिंह चौटाला यांनी बजावली. ते ज्याला पाठिंबा देणार त्याचं सरकार हरियाणामध्ये अस्तित्वात येणार होतं. त्यावेळी चौटाला यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि हरियाणामध्ये भाजपचे खट्टर मुख्यमंत्री तर चौटाला उपमुख्यमंत्री बनले.

हरयाणामध्ये दुष्यांत सिंह चौटाला यांच्या पक्षाची ओळख ही शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून तर खुद्द चौटाला यांची ओळख शेतकरी नेता म्हणून राहिलेली आहे. दिल्लीच्या सीमेवर जेव्हापासून शेतकरी आंदोलन सुरु झालंय तेव्हापासून चौटाला यांनी या कायद्याच्या बाजूने वक्तव्य केलंलं नव्हतं. जननायक जनता पार्टीच्या 10 आमदारांपैकी बहुतांश आमदारांचं शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याविषयचं मत होतं किंबहुना ते याचमुळे नाराज होते. याचा सगळ्याचा परिणाम थेट हरयाणातल्या एनडीएच्या सरकारवर होणार का, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

हरयाणाच्या भाजप सरकारवर संकट?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.