ईडीचा धडाका सुरुच, आधी रियाची 8 तास, शोविकची 18 तास चौकशी, आता पुन्हा रियासह वडिलांना समन्स

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात ईडीने चौकशीचा धडाका सुरुच ठेवला आहे (ED inquiry of Rhea Chakroborty).

ईडीचा धडाका सुरुच, आधी रियाची 8 तास, शोविकची 18 तास चौकशी, आता पुन्हा रियासह वडिलांना समन्स
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 8:03 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात ईडीने चौकशीचा धडाका सुरुच ठेवला आहे (ED inquiry of Rhea Chakroborty). आतापर्यंत ईडीने सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची 8 तास आणि तिचा भाऊ शोविकची 18 तास चौकशी केली आहे. आता ईडीने पुन्हा रियाला आणि तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना चौकशीसाठी बोलावले आहे. आज (10 जुलै) ही चौकशी पूर्ण होईल.

ईडीने सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यावरुन झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहार प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर 15 कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचाही या चौकशी तपास केला जात आहे. याचाच भाग म्हणून रिया आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे.

आज रिया आणि तिच्या वडिलांसह तिचा भाऊ शोविकलाही बोलावले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांचे इतर व्यवहार देखील तपासण्यास सुरुवात केली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी करणार आहे. या आत्महत्या प्रकरणात आर्थिक अपहार असल्याच्या संशायावरुन ही चौकशी सुरु आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मनी लाँड्रिंग प्रकरणात रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty Inquiry) याची कसून चौकशी सुरु आहे. शौविक चक्रवर्ती या प्रकरणातील संशयित आहे. सुशांतच्या खात्यावरुन शौविकच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप आहे. त्याच अनुषंगाने आज चौकशी होईल.

शौविकची त्याच्या शिक्षणाबाबत, त्याच्या कुटुंबाबाबत, त्याच्या आर्थिक उत्पन्नाच्या साधनांचीही विचारणा केली जात आहे (Showik Chakroborty Inquiry).

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

प्रश्न –

1) शौविक तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?

2) तुझा आणि तुझ्या कुटुंबाचं, उत्पन्नाचं साधन काय आहे?

3) तुझं कोणत्या बँकेत खातं आहे?

4) तुझ्या कुटुंबाचं कोणत्या बँकेत खातं आहे?

5) रियाबद्दल तुमच्या कुटुंबाचं काय मत आहे?

6) रियाचं तुमच्या कुटुंबासोबत भांडण आहे का?

7) सुशांतबाबत तुमच्या कुटुंबाचं काय मत होतं?

8) सुशांतवरुन तुमच्या कुटुंबात भांडण होत होती का?

9) सुशांतच्या खात्यातील पैसे कुठे गेले?

10) सुशांतच्या पैशाचा तुम्ही कसा व्यवहार केला आहे?

आदी अनेक प्रश्न शौविकला विचारण्यात येत आहेत. शौविककडून रियाबाबतही बरीच माहिती विचारण्यात आली आहे. शौविकने याची माहिती दिली आहे. या प्रकरणात आता आज रिया, तिच्या कुटुंबातील इतर सदस्य आणि सिद्धार्थ पिठाणी यांची चौकशी होणार आहे.

संबंधित बातम्या :

लिल्लू ते बेबू, सुशांतच्या नोट्समध्ये उल्लेख, रियाकडे सुशांतची खास भेट

ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल

Sushant Death Case | रियाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची 9 तास ईडी चौकशी, आता रियाचा नंबर

रियाकडे कोट्यावधींचे दोन फ्लॅट, सुशांतच्या खात्यातून 15 कोटीच्या व्यवहाराचा आरोप, ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये

ED inquiry of Rhea Chakroborty

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.