US Election | कोरोनाच्या लसीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून?

कोरोनाची लस फक्त अमेरिकन लोकांचे जीवच नाही, तर ट्रम्प यांची सत्ता वाचवण्यासाठी सुद्धा महत्वाची आहे (Effect of Corona Vaccine on US Election).

US Election | कोरोनाच्या लसीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून?
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 12:10 AM

वॉशिंग्टन : जगाच्या नजरा ऑक्सफर्डच्या लसीकडे आहेत. मात्र अमेरिकेचं लक्ष 22 ऑक्टोबरकडे लागलंय. कारण, 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी लस मिळवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण यंत्रणा लसीच्या कामात झोकून दिलीय. कोरोनाची लस फक्त अमेरिकन लोकांचे जीवच नाही, तर ट्रम्प यांची सत्ता वाचवण्यासाठी सुद्धा महत्वाची आहे (Effect of Corona Vaccine on US Election). म्हणूनच अमेरिकेत 22 ऑक्टोबरला फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या लसीच्या प्रगतीबाबत चर्चा होणार होईल. मात्र 22 ऑक्टोबरआधीच कोरोनाच्या लसीसाठी अमेरिकेनं हालचाली सुरु केल्या आहेत.

मॉडर्ना आणि फायझर या दोन्ही लसी अमेरिकेसाठी महत्वाच्या आहेत. दोन्ही लसींच्या तिसऱ्या टप्प्याचे निकाल प्रतीक्षेत आहेत. न्यूयॉर्कसारखं आर्थिक केंद्र कोरोनापासून सावरतंय. मात्र त्याजागी कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडा हे तिन्ही राज्यं कोरोनाची नवी केंद्र बनतायत.

ट्रम्प यांच्या चिंतेची गोष्ट म्हणजे हे तिन्ही राज्यं अमेरिकेतली सर्वाधिक लोकसंख्येची राज्यं आहेत. त्यात कॅलिफोर्नियाच्या सिनेटर म्हणून खुद्द कमला हॅरिस यंदा डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक मैदानात आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षाला फटका बसला, तर ट्रम्प यांना सत्तेत कमबॅक करणं अडचणीचं आहे. म्हणून मतदानाआधीच डोनाल्ड ट्रम्प कोरोनाच्या लसीची घोषणा करण्यासाठी आतूर झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार सध्या 30 हून जास्त कोरोना चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. ज्यात अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि भारताच्या एका लसीचा समावेश आहे. मात्र चीनची बाजू घेतल्याच्या आरोपात अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडलाय. त्यामुळे अमेरिकेची लस 22 ऑक्टोबरच्या आत आली, तरी तिच्या मान्यतेसाठी जागतिक आरोग्य संघटनेला विचारलं जाणार की नाही, हा प्रश्न आहे. याआधी रशियानं सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेला विचारात न घेता लसीची घोषणा केली. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं रशियन लसीच्या दर्जावर आक्षेप घेतला. त्यामुळे अमेरिका नेमकं काय करेल, हे पाहणं महत्वाचं आहे.

निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लसीचं काम सुरु झालं असेल, तर तो मोठा धोका ठरु शकतो. पहिल्या दोन चाचण्या यशस्वी ठरल्यानं अमेरिकेला काहिसा दिलासा आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यासाठी ट्रम्प यांच्याकडे लसीसाठी फक्त काही महिने उरले आहेत. इतक्या कमी वेळेत लसीचा दर्जा राखणं आणि मतदानाआधी लसीवर शिक्कामोर्तब करणं मोठं आव्हान असेल. त्यामुळे फक्त अमेरिकाच नव्हे, तर जग सुद्धा 22 ऑक्टोबरची वाट पाहतंय.

संबंधित बातम्या :

यांचंही ठरलं! जो बिडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, डेमोक्रॅटिक पक्षाची अधिकृत घोषणा

Corona World News | रशियाची लस माकडांनाही देणार नाही, अमेरिकेने लसीची खिल्ली उडवली

Corona World News | Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा

व्हिडीओ पाहा:

Effect of Corona Vaccine on US Election

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.