अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, 10 दिवसातील दुसरी घटना

पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी रोड लगत घडली ही घटना घडली. (Eight year old boy died in attack of leopard manikdaundi road of Pathardi)

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, 10 दिवसातील दुसरी घटना
प्रतिकात्मक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 1:38 PM

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी रोड लगत घडली ही घटना घडली. 10 दिवसात दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 10 दिवसात दोन जणांचे जीव गेल्यामुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ माजली आहे. (Eight year old boy died in attack of leopard manikdaundi road of Pathardi)

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव सक्षम गणेश आठरे वय 8 असं आहे. तो आजोबांसह घराच्या पडवीमध्ये झोपला होता. रात्री तीन वाजता बिबट्याने हल्ला केला. यानंतर नातेवाईक आणि वनविभागाच्या पथकाने शोध घेतल्यानंतर तुरीच्या पिकात मुलाचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाथर्डी तालुक्यातील दुसरी घटना

अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील काकडदरा येथील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. 15 ऑक्टोबरला ही घटना घडली होती.  ती चिमुकली रात्री दरवाजाजवळ खेळत होती. त्याचवेळी बिबट्या काकडदारातील नागरी वस्तीत घुसला. ती चिमुकली तिथेच खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. बिबट्या तिला उचलू घेऊन पुन्हा जंगलात निघून गेला. या प्रकाराने वस्तीवर गोंधळ उडाला.

पावसामुळे बिबट्याने उचलून नेलेल्या चिमुकलीच्या शोधात अडथळे आले होते. या घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक काकडदरा येथे सर्च ऑपरेशन केल्यानंतर त्यावेळी ती मृत अवस्थेत आढळून आली.

दरम्यान, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

नातवावरचा वार आजीने झेलला, टोपलीने मारुन बिबट्याला पळवलं

घराजवळ खेळताना बिबट्याची झडप, नगरमध्ये चिमुकलीचा मृत्यू

(Eight year old boy died in attack of leopard Manikdaundi road of Pathardi)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.