Bihar Election | … म्हणून टीव्ही चॅनल आणि आयोगाच्या वेबसाईटवर आकड्यांचा फरक : निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत बिहार निवडणूक निकाल घोषित होण्यास रात्री उशीर होईल,असं स्पष्ट केलं आहे.
पाटणा : बिहार निवडणूक निकालाचे कल सातत्याने बदलत आहेत. त्यातच आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक निकाल घोषित होण्यास रात्री उशीर होईल,असं स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी टीव्ही चॅनल आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारी यातील तफावत का आहे याचंही कारण सांगितलं. “आयोगाकडून येणारी आकडेवारी ही स्थानिक पातळीवर अनेक स्तरातून तपासून येते आणि मगच जाहीर केली जाते. त्यामुळेच नागरिकांना आयोगाच्या आकडेवारीत आणि चॅनलच्या आकडेवारीत फरक दिसत आहे,” अशी माहिती आयोगाने दिली (Election Commission comment on when Bihar Assembly Election result will declared.
निवडणूक आयुक्त म्हणाले, “बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी सरासरी 35 फेऱ्या होतील. जे मतदारसंघ मोठे आहेत तेथे 50 फेऱ्यांपर्यंतही आकडा वाढू शकतो. प्रत्येक फेरीला 20-30 मिनिटे लागतात. मतमोजणी करताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निश्चित करण्यात आलेले सर्व नियम पाळले जात आहेत. निवडणूक आयोगाने पोलिंग कर्मचाऱ्यांना कोणतीही घाई न करता काम करण्यास सांगितलं आहे. तसेच सर्व नियम पाळत आवश्यक तो वेळ घेण्यास सांगितलं आहे.”
“या सर्व पार्श्वभूमीवर इतरवेळीच्या तुलनेत यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास उशीर होईल. माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल येण्यास रात्री उशीर होईल. काही निकाल जाहीर देखील झाले आहेत. ते तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. यावेळी आयोगाने तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नागरिकांना अद्ययावत निकालाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आयोगाच्या अॅपवर तुम्हाला अधिकृत माहिती देखील पाहता येईल,” अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
“ही सर्व आकडेवारी अनेक स्तरातून तपासली जाते आणि मगच प्रकाशित केली जाते. त्यामुळेच तुम्हाला निवडणूक आयोगाच्या आकडेवारी आणि वृत्तवाहिन्यांच्या आकडेवारीत फरत दिसत असेल. असं असलं तरी आम्ही लवकरात लवकरत तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे,” असंही आयोगाने नमूद केलं.
संबंधित बातम्या :
संबंधित व्हिडीओ :
Election Commission comment on when Bihar Assembly Election result will declared