देशभरात भाजपकडून ‘गुपकर गँग’वर टीका, पण कारगिलमध्ये सत्तेसाठी फारुख अब्दुल्लांशी युती

कारगिलमध्ये भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सचा हा आगळावेगळा स्नेहभाव पाहायला मिळत आहे. | Gupkar Gang

देशभरात भाजपकडून 'गुपकर गँग'वर टीका, पण कारगिलमध्ये सत्तेसाठी फारुख अब्दुल्लांशी युती
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 10:23 AM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या गुपकर आघाडीवर (Gupkar Gang) जोरदार टीका करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन गुपकर गँग परकीय शक्तींच्या मदतीने देशातील स्थैर्य बिघडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचाही आरोपही केला होता. मात्र, त्यांच्याच भाजप पक्षाने कारगिलमध्ये एका समितीवर वर्चस्व ठेवण्यासाठी गुपकर आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सशी युती केल्याचे समोर आले आहे. (BJP and National Conference shares power in Ladakh Autonomous Hill Development Council)

लडाख स्वायत्त विकास प्राधिकरणात (Ladakh Autonomous Hill Development Council) भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सचा हा आगळावेगळा स्नेहभाव पाहायला मिळत आहे. या समितीमध्ये एकूण 30 जणांचा समावेश आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे 10, काँग्रेसचे आठ आणि भाजपच्या तीन सदस्यांचा समावेश आहे. तर पाच जण हे अपक्ष आहेत. याशिवाय, लडाख केंद्रीय प्रशासनाने शिफारस केलेल्या चार जणांची या समितीवर वर्णी लागली आहे.

या समितीचे अध्यक्षपद नॅशनल कॉन्फरन्सच्या फेरोज खान यांच्याकडे आहे. तर कार्यकारी सदस्यांमध्ये भाजपच्या मोहम्मद अली चंदन यांचा समावेश आहे. 2018 साली झालेल्या या समितीच्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. मात्र, आता सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे आता विरोधकांकडून भाजपच्या या दुटप्पी भूमिकेवर टीका होण्याची शक्यता आहे.

काय आहे गुपकर आघाडी? जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाविरोधात तेथे सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लरेशनची (पीएजीडी) घोषणा केली. हे एक प्रकारचं घोषणापत्र आहे. या घोषणापत्रातील मागण्या मान्य करुन घेण्यासाठी तयार केलेल्या सर्वपक्षीय आघाडीलाच गुपकर आघाडी नाव देण्यात आले आहे. गुपकर हे श्रीनगरमधील एका मुख्य रस्त्याचं नाव आहे. या ठिकाणी सर्वच प्रमुख नेत्यांचे निवासस्थानं असून जम्मू काश्मीरचे बहुतांश मोठी प्रशासकीय कार्यालयं देखील याच भागात आहेत. त्यामुळेच गुपकर या नावाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

संबंधित बातम्या:

देशातील राजकारणाचा पारा वाढवणारी जम्मू-काश्मिरची गुपकर आघाडी काय आहे?

‘काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही’, फडणवीसांच्या आरोपांना थोरातांचे सडेतोड प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | काहीही झालं तरी काश्मीरमध्ये 370 कलम लागू होणार नाही, फडणवीसांचा ‘गुपकर’ला इशारा

(BJP and National Conference shares power in Ladakh Autonomous Hill Development Council)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.