वॉशिंग्टन : आकाशात उडणारं विमान अचानक गाड्या धावत असलेल्या महामार्गावर धावू लागलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण असं खरोखर घडलं आहे. इतकंच नाही तर हा प्रसंग कॅमेऱ्यात कैदही झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. या विमानावर ही वेळ का आली, आकाशात उडणारं विमान धावपट्टीवर लँडिंग करण्याऐवजी रस्त्यावर लँडिंग का करावं लागंल असे अनेक प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडत आहेत (Emergency landing of one engine plan on highway horrific incident video goes viral).
हा व्हिडीओ अमेरिकेच्या मिनेसोटा (Minnesota) येथील आहे. या ठिकाणी एक इंजिनच्या या विमानात तांत्रिक दोष झाल्याने वैमानिकावर विमान रस्त्यावर उतरवण्याची नामुष्की आली. विशेष म्हणजे विमानाचं लँडिंग करताना या महामार्गावर गाड्या धावत होत्या. त्यामुळे रस्त्यावर येताच हे विमान आपल्या समोर धावणाऱ्या एका एसयूव्ही (SUV) कारला धडकलं. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला. अपघातग्रस्त एसयूव्ही कार चालकाने देखील आपला अनुभव सांगताना या धडकेनंतरही आम्ही सर्वजण सुरक्षित असल्याचं सांगत आश्चर्य व्यक्त केलं.
ICYMI: A plane landed on 35W last night. (Yes, really!)
While this isn’t *quite* what we mean by a “multimodal transportation system,” we’re glad no one was injured and are impressed by the pilot’s effort to #zippermerge from above! pic.twitter.com/imPdiQ1wMX
— Minnesota Department of Transportation (@MnDOT) December 3, 2020
हा व्हिडीओ मिनेसोटा डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टने 4 डिसेंबरला आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “या घटनेत कोणत्याही प्रकारचा अपघात झाला नाही. याचा आम्हाला आनंद आहे.’ आतापर्यंत हा व्हिडीओ 1 लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक या व्हिडीओच्या खाली वैमानिकाकडून घेण्यात आलेला हा निर्णय बेजबाबदारपणाचा असल्याची टीका करत आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
आजीबाईच्या अंगावरुन ट्रक गेला… पुढे काय झालं?, पाहा थक्क करणारा व्हिडीओ
अरे यार…! केस कापताना लटका राग, चंद्रपूरचा अनुश्रुत पेटकर सोशल मीडियावर हिट
मगरीच्या तोंडातून आपल्या कुत्र्याला वाचवलं, 74 वर्षांच्या आजोबांचा धाडसी व्हिडीओ व्हायरल
Emergency landing of one engine plan on highway horrific incident video goes viral