माजी मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला; घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ

Ex Minister Suresh Navle PA Attack : माजी मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पिएवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

माजी मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला; घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ
सुरेश नवले, माजी मंत्री Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 4:12 PM

रात्रीचे नऊ वाजले होते. रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती घराच्या समोर उभी होती. इतक्यात दोनजण दुचाकीवरून आले अन् काही कळण्याच्या आतच त्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने मानेवर सपासप वार केले. मात्र पीडित व्यक्तीने हा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याला तितकंस यश आलं नाही. या हल्ल्यात उजव्या हाताच्या मनगटावर मोठी जखम झाली. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून माजी मंत्री सुरेश नवले यांचे पिए आहेत. माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पिएवर जीवघेणा हल्ला झालाय. त्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

माजी मंत्री सुरेश नवले यांच्या स्वीयसहाय्यक ललित अब्बड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ललित अब्बड यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. दोन अज्ञातांनी ललित अब्बड यांच्यावर बीडमधील घटनेने खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून येत दोघांनी ललित अब्बड यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यातून ललित अब्बड थोडक्यात बचावले आहेत.

ललित अब्बड जखमी

माजी मंत्री सुरेश नवले यांचे पीए ललित अब्बड यांच्यावर रात्रीच्या सुमारास कोयत्याने हल्ला करण्यात आला. अज्ञात दोन जणांनी चढविलेल्या हल्ल्यात ललित अब्बड यांच्या हाताला मार लागला आहे. माजी मंत्र्यांना पीएवर हल्ला झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अब्बड यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हल्लेखोरांचा शोध सुरु

ललित अब्बड यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर दोघे दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेले. ललित अब्बज यांना तातडीने बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं ललित अब्बड यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित अब्बड यांच्यावर कुणी हल्ला केला? याचा पोलीस शोध घेत आहेत. हा हल्ला कुणी केला? यामागचा हेतू काय होता? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.