माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक

कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. पीक विमा आणि रस्त्याच्या कामाबद्दल रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांसह हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक
Follow us
| Updated on: Jun 25, 2019 | 2:03 PM

औरंगाबाद : कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. पीक विमा आणि रस्त्याच्या कामाबद्दल रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांसह हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली. हर्षवर्धन जाधव यांनी हातनूर येथे सुमारे तीन तास रास्ता रोखला होता. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली.

हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. जाधव यांनी औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. अपक्ष निवडणूक लढणाऱ्या हर्षवर्धन जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार होते. त्यांनी मराठा आरक्षणासाठी शिवसेनेसह आमदारकीही सोडली होती. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष लढवली होती.

हर्षवर्धन जाधव यांनी आपली राजकीय कारकीर्द मनसेतून केली. मनसेकडून ते विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडमधून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या 

खैरेंच्या आरोपांना हर्षवर्धन जाधवांची सडेतोड उत्तरं !   

पराभवामुळे चंद्रकांत खैरेंचं मानसिक संतुलन बिघडलं : हर्षवर्धन जाधव  

दानवेंनी पूर्ण भाजपा पाठीशी उभी करतो सांगितलं, पण मदत केली नाही : हर्षवर्धन जाधव

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.