चीन तैवानवर हल्ला करणार? वाचा ड्रॅगनचा संपूर्ण ‘गेम प्‍लॅन’

तैवानवर दबाव वाढवण्यासाठी चीन सातत्याने नवनव्या मार्गांचा अवलंब करत आहे. यामुळे तैवान आणि चीनमध्ये युद्ध होते की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे.

चीन तैवानवर हल्ला करणार? वाचा ड्रॅगनचा संपूर्ण 'गेम प्‍लॅन'
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 11:19 PM

बीजिंग : तैवानवर दबाव वाढवण्यासाठी चीन सातत्याने नवनव्या मार्गांचा अवलंब करत आहे. यामुळे तैवान आणि चीनमध्ये युद्ध होते की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे. मात्र, संरक्षण तज्ज्ञांच्या मते चीनकडून ही रणनीती केवळ तैवानवर दबाव तयार करण्यासाठी वापरली जात आहे. यामागे तैवानसोबत काम करण्याचा चीनचा उद्देश नाही (Expert openion on Chinas military game plan on Taiwan threatening invasion).

नुकतीच चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) तैवान स्ट्रेटजवळ एक सैन्य सरावही केला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. या सराव शिबिरात तैवानच्या “डबल टेंथ” या एका बेटावर हल्ला करण्याचाही सराव करण्यात आला. यात एक बेट जिंकण्याच्या उद्देशाने हल्ल्यासाठी लँडिंग ड्रिल देखील करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून चीनचे लढाऊ आणि बॉम्बवर्षाव करणारी विमानं तैवानची स्ट्रेट मीडिअन लाईन ओलांडून बेटाच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनपर्यंत येत आहेत. तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अशा घटना मागील काही महिन्यांपासून दररोजच घडत आहेत.

तैवानची अमेरिकेसोबत जवळीक वाढल्यानंतर चीनच्या या रणनीतीत बदल झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेचे आरोग्य सचिव एलेक्स अजर यांनी ऑगस्टमध्ये तैवानचा दौरा केल्यानंतर चीनच्या रणनीतीत विशेष बदल झाला. एलेक्स अजर हे मागील 41 दिवसांमध्ये तैवानला येणारे पहिले वरिष्ठ अधिकारी आहेत. या दौऱ्यानंतर चीनने त्यांच्या हितसंबंधांचं उल्लंघन झाल्याचा दावा केला.

चीनकडून सातत्याने तैवानवर आपला दावा केला आहे. तसेच अमेरिकेकडून तैवानला होणारी मदत ही चीनच्या धोरणांचं उल्लंघन असल्याचाही दावा चीनकडून केला जात आहे. अमेरिकेच्या थिंक टँकचे एक वरिष्ठ संरक्षण तज्ज्ञ डेरेक ग्रॉसमॅन म्हणाले, “तैवान नेत्यांना भडकावण्यासाठी आणि तैवानला कोणताही निर्णय घेऊन प्रतिक्रिया देण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची करण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणात सैन्याच्या हालचालीचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.”

“वारंवार तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी करुन त्याला सामान्य स्थिती करण्यासाठी उपयोग होईल, असा चीन विचार करत आहे. यामुळे तैवानला प्रत्यक्ष युद्धाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेणं कठीण जाईल, असाही चीनचा अंदाज आहे,” असंही ग्रॉसमॅन म्हणाले.

संबंधित बातम्या :

चीनचा भयानक प्लॅन! अमेरिकन नागरिकांचे डीएनए आणि मेडिकल डाटाही गोळा करण्याचं काम सुरु?

आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसू नका, भारतानं चीनला ठणकावलं

भारतीय व्यापाऱ्यांचा चीनला 40 हजार कोटींचा झटका, दिवाळीला ‘मेड इन चायना’वर बंदी

Expert openion on Chinas military game plan on Taiwan threatening invasion

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.