US Election | निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांना जेरुसलेममध्ये नवी नोकरी? नगरपालिकेकडून ‘जॉब ऑफर’

डोनाल्ड ट्रम्प यांना जेरुसलेममधील नगरपालिकेने नोकरीची ऑफर दिली आहे. या ऑफरचीही जोरदार चर्चा होत आहे.

US Election | निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांना जेरुसलेममध्ये नवी नोकरी? नगरपालिकेकडून 'जॉब ऑफर'
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 9:33 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर अमेरिकेचे मावळते अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या भविष्याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार चर्चा सुरु आहे. ट्रम्प आता काय निर्णय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांना जेरुसलेममधील नगरपालिकेने नोकरीची ऑफर दिली आहे. या ऑफरचीही जोरदार चर्चा होत आहे (Facebook post of new job offer to Donald Trump by Jerusalem Municipal Corporation).

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर जेरुसलेम नगरपालिकेने म्हटलं आहे, “ट्रम्प यांनी काळजी करु नये. आमच्याकडे ट्रम्प यांची योग्यता असलेले आणि ते अर्ज करु शकतील अशी अनेक पदं रिक्त आहेत.” /या नगरपालिकेने आपल्या फेसबुक पेजवर या नोकरीला अर्ज करायची लिंक शेअर केली आहे. तसेच त्यासोबत लिहिलं आहे, ‘डोनाल्ड जे. ट्रम्प तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या जेरुसलेममधील नोकऱ्यांचा हा ‘जॉब बोर्ड’ दररोज नव्या संधीसह अपडेट होत राहिल.’

जेरुसलेम पालिकेच्या पेजवरील पोस्ट हटवली

जेरुसलेम पोस्ट या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार वादानंतर जेरुसलेम नगरपालिकेने तात्काळ ही पोस्ट डिलीट केली. नगरपालिकेच्या प्रवक्त्यांनी ही पोस्ट चुकीने पोस्ट झाल्याचं आणि हटवल्याचं म्हटलं आहे.

जेरुसलेम आणि डोनाल्ड ट्रम्प कनेक्शन काय?

ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात अमेरिकेच्या 70 वर्षांमधील परराष्ट्र धोरणाला गुंडाळत डिसेंबर 2017 मध्ये जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव स्वीकार करण्यास नकार

दरम्यान अमेरिकेच्या निवडणुकीत जो बायडन यांचा विजय होत असताना दिसत असला तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र अद्यापही पराभव स्वीकारलेला नाही. त्यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत निकालाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं म्हटलंय.

संबंधित बातम्या :

डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय रद्द करण्यासाठी बायडन यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’, भारतासाठीही ‘हे’ निर्णय महत्त्वाचे

US Election 2020: ‘मेलानिया लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार’, माजी सहकाऱ्याचा दावा

US Election 2020 | जो बायडन यांचा 20 जानेवारीला शपथविधी, अमेरिकेत मतमोजणी सुरुच

व्हिडीओ पाहा :

Facebook post of new job offer to Donald Trump by Jerusalem Municipal Corporation

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.