जालन्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जालना : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तात्यासाहेब भाऊसाहेब थोरात असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना अंबड तालुक्यातील कुरण परिसरात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पाण्याची टंचाई असल्याने तात्यासाहेब यांच्या शेतात काही पिकत नव्हते. त्यामुळे […]
जालना : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तात्यासाहेब भाऊसाहेब थोरात असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना अंबड तालुक्यातील कुरण परिसरात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पाण्याची टंचाई असल्याने तात्यासाहेब यांच्या शेतात काही पिकत नव्हते. त्यामुळे सतत डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. यामुळे तात्यासाहेब या शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहे.
राज्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका राज्यातील शेतकरी बांधवांना पडत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरीही कंटाळेलला आहे. तसेच पाण्याअभावी शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा कठीण परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
नाशिकमध्ये चार महिन्यात 25 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तर गेल्या 3 महिन्यात 600 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची माहिती एका अहवालातून समोर आली होती.