ओला दुष्काळ जाहीर करा, औरंगाबादेत शेतकरी आक्रमक! जिल्हाधिकारी कार्यालयावर फेकल्या कुजलेल्या भाज्या

राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते पाहणी दौऱ्यावर आहेत. मात्र सरकारकडून अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी सडलेल्या भाज्या आणि पीक जिल्हाधिकारी कार्यालयावर फेकलं.

ओला दुष्काळ जाहीर करा, औरंगाबादेत शेतकरी आक्रमक! जिल्हाधिकारी कार्यालयावर फेकल्या कुजलेल्या भाज्या
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 1:01 PM

औरंगाबाद: राज्यात परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अशावेळी सरकारनं तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून होतेय. पण सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळींचे पाहणी दौरे सोडले तर अद्याप मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन केलं. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सडलेली पिकं जिल्हाधिकारी कार्यालयावर फेकली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. (Aurangabad farmers protest against cm Uddhav Thackeray government)

गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना, हिंगोली अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यात सोयाबीन, मका, तूर, कापूस, उसाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी काढून ठेवलेलं सोयाबीन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेलं. शेकडो हेक्टरवरील उभा ऊस आडवा झाला. त्यामुळं आता सरकारकडून तातडीनं मदत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण उद्याप सरकारकडून कुठलिही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार राडा घातला. त्यावेळी पोलिसांनी या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढलं.

शेतकऱ्यांची दिवाळी चांगली साजरी व्हावी असं सरकारला वाटत असेल, तर कुठलाही पंचनामा किंवा कुठलिही अट न घालता प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ७५ हजार मदत द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसंच खरिपाचं पीक तर आता गेलं. मात्र, रब्बी हंगामाच्या तयारीसाठी सरकारनं प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार द्यावे, अशी मागणीही या शेतकऱ्यांची आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- मुख्यमंत्री

हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नेमकं नुकसान किती झालं आहे? शेतकऱ्यांनी किती मदत करायची? याची माहिती गोळा करत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मदत जाहीर करणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. येत्या तीन-चार दिवसांतील दौऱ्यानंतर किती मदत करायची याचा साधारण अंदाज येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

…मग शेतकऱ्यांसाठी आखडता हात का? राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्य सरकार साखर कारखानदारांना मदत करण्यासाठी तिजोरीत पैसे नसताना तातडीने थकहमी देते. मग, शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विचारला आहे. शेट्टी आज पंढरपुरात झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत.

संबंधित बातम्या:

साखर कारखानदारांना पैसे देता मग शेतकऱ्यासांठी आखडता हात का?; राजू शेट्टींचा उद्धव ठाकरेंना सवाल

केंद्रानं राज्याचं देणं द्यावं, मदतीसाठी हात पसरावे लागणार नाही; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना झापलं

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

Aurangabad farmers protest against cm Uddhav Thackeray government

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.