Fast and Furious च्या चाहत्यांना झटका, सिरीज बंद होणार!
Fast and Furious या चित्रपटाच्या सिरीजचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. लोक या सिरीजमधील प्रत्येक चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट पाहात असतात.
मुंबई : Fast and Furious या चित्रपटाच्या सिरीजचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. लोक या सिरीजमधील प्रत्येक चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट पाहात असतात. परंतु ही सिरीज आता बंद होणार आहे. युनिव्हर्सल पिक्चर्सने बुधवारी Fast and Furious सिरीज (फ्रेंचाइजी) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. युनिव्हर्सल पिक्चर्सने याबाबत म्हटले आहे की, 11 वा पार्ट प्रदर्शित झाल्यानंतर फ्रेंचाइजी बंद केली जाईल. (Fast and Furious will closed after 11 sequel)
2001 मध्ये या फ्रेंचाइजीचा पहिला पार्ट म्हणजेच ‘फास्ट एंड फ्यूरियस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर विन डीझेलच्या नेतृत्वात या फ्रेंचायजीचे आतापर्यंत आठ भाग प्रदर्शित झाले आहेत. 28 मे 2021 रोजी फ्रेंचाइजीचा 9 वा भाग प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर आगामी काळात चित्रपटाचा 10 वा आणि 11 वा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विन डीझेलसह यामध्ये मिशेल रॉड्रिग्ज, टायर्स गिब्सन, ख्रिस लुडाक्रिस ब्रिज, जॉर्डन ब्राव्हस्टर, नॅथली इमॅनुएल आणि सुंग कांग हे मुख्य कलाकार असतील. दिग्दर्शक जस्टिन ली (Justin Lee) पुढील दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहेत.
ली यांनी आतापर्यंत या फ्रेंचायजीचे चार चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ज्यामध्ये ‘द फास्ट अँड द फ्यूरियस: टोकियो ड्रिफ्ट’ (2006), ‘फास्ट अँड फ्यूरियस (2009), ‘फास्ट फाइव्ह’ (2011), ‘फास्ट अँड फ्यूरियस 6’ (2013) या चित्रपटांचा समावेश आहे. फास्ट अँड फ्यूरियस सिरीज बंद होणार म्हणजे सर्व काही संपले असे मुळीच नाही. युनिव्हर्सल स्टुडिओ फास्ट अँड फ्यूरियसच्या व्यक्तिरेखांवर आधारित नवनवे चित्रपट बनवण्याचे काम सुरु अहे.
फास्ट अँड फ्यूरियस फ्रेंचाइजी स्पिनऑफ ‘हॉब्स अँड शॉ’ने बॉक्स ऑफिसवर तब्बल $759.9 मिलियन अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. या सिरीजमध्ये ड्वेन जॉनसन (Dawyn Johnson) म्हणजेच दी रॉक आणि जेसन स्टॅथम प्रमुख भूमिकेत आहेत.
फास्ट अँड फ्यूरियस सिरीजच्या सातव्या भागाने इतिहास रचला होता. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 151 कोटी अमेरिकन डॉलर्सची कमाई केली होती. त्यानंतर 2017 मध्ये चित्रपटाच्या आठवा पार्ट (The Fate of the Furious) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने 123 कोटी अमेरिकन डॉलर्सची कमाई केली.
संबंधित बातम्या
सल्या आणि लंगड्याचा ‘फ्री हिट दणका’, सैराटची जोडी पुन्हा एकत्र!
Sanjay Dutt | कर्करोगावर यशस्वी मात, संजू बाबाकडून चाहत्यांना आनंदाची बातमी!
Vijay Sethupathi | ‘800’तून बाहेर पडल्यानंतरही वाद सुरूच, विजय सेतूपतीच्या मुलीला बलात्काराची धमकी
नव्या वेब सीरिजसाठी कपिल शर्मा 20 कोटी घेणार?
(Fast and Furious will closed after 11 sequel)