ल्युडोमध्ये बाबांची चीटिंग, 24 वर्षीय तरुणीची कोर्टात धाव
ल्युडो खेळताना माझ्या वडिलांनी चीटिंग केली असून मला न्याय मिळावा अशी मागणीही या 24 वर्षीय तरुणीने केल्याचं समोर आलं आहे. (Father cheats in Ludo game daughter approaches court)
भोपाळ : ल्युडो (LUDO) खेळताना वडिलांनी चीटिंग केली म्हणून मुलीने थेट तक्रार दाखल केल्याचा अजब प्रकार भोपाळमध्ये घडला आहे. ल्युडो खेळताना माझ्या वडिलांनी चीटिंग केली असून, मला न्याय मिळावा अशी मागणीही तरुणीने केल्याचं समोर आलं आहे. तर मुलीची समजूत काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाचीही (family court) दमछाक झाली असून, न्यायालयाला चार वेळा समुपदेशन करावं लागल्याने सगळेच अवाक आहेत. (Father cheats in Ludo game daughter approaches court)
मुलीने तक्रार करताना, माझे वडील खेळताना चीटिंग करतील असं वाटलं नव्हतं, असं म्हटलं आहे. तसेच “मी माझ्या वडिलांवर खूप विश्वास ठेवला. ते खेळताना चीटिंग करतील असं मला वाटलं नव्हतं. वडिलांनी माझा विश्वासघात केला असून, मला न्याय मिळावा अशी मागणीही तिने केली. त्याचबरोबर “मला आता त्यांना वडील म्हणावं वाटत नसल्याचही तिने कौटुंबिक न्यायालयाला सांगितलं.
Madhya Pradesh: A 24-year-old woman approaches Bhopal Family Court, alleging cheating by her father in a ludo game. “She said she trusted her father so much & didn’t expect him to cheat. We have conducted 4 counselling sessions with her,” says Sarita, a counsellor at the court. pic.twitter.com/WDgukJ53Jn
— ANI (@ANI) September 26, 2020
मुलीचे चार वेळा समुपदेशन
मुलीने केलेल्या अजब तक्रारीमुळे सगळेच अवाक झाले आहेत. कित्येक वेळा समजावूनही मुलगी आपल्या तक्रारीवर ठाम राहील्याने सगळेच हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. तर समजावून सांगण्यासाठी न्यायालयाला मुलीचं तब्बल चार वेळा समुपदेशन करावं लागल्याचंही समोर आलं. शेवटी न्यायालयाच्या अथक प्रयत्नांनंतर मुलीचं वडिलांबद्दलचं मत बदलल्याचं न्यायालयाने (family court) म्हटलं आहे. समुपदेशनानंतर मुलगी वडिलांबद्दल सकारात्मक विचार करु लागल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हे ही वाचा :
चीनला पुन्हा दणका, आणखी 47 चिनी अॅपवर बंदी, आता PUBG आणि AliExpress चा नंबर?
दरम्यान, सध्याच्या ऑनलाईनच्या जगात इंटरनेटवर रोज नवनवीन गेम येतात. प्बजीसारख्या (PUBG) गेममुळे कित्येक तरुणांचं मानसिक आरोग्य बिघडल्याच्याही घटना घडल्या आहेत. ब्ल्यू व्हेलसारख्या (Blue Whale) मोबाईल गेममुळे तर कित्येकांनी आत्महत्याही केल्या. अशातच 24 वर्षीय मुलीने वडिलांविरोधात तक्रार केल्याचे समोर आल्याने ऑनलाईन गेमिंग बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच मुलांनी मोबाईल गेम, कॉम्युटर गेमच्या आहारी जाऊ नये असं मानसोपचार तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
पब्जीमुळे तरुणाची मानसिक अवस्था बिघडली, उपचारादरम्यानही गेमबाबतच बडबड
बेळगाव : मुलाला लागला ‘पब्जी’चा लळा, पित्याचा चिरला गळा
पब्जी गेम खेळू न दिल्याने छोट्या भावाने मोठ्या भावाचा खून केल
ब्लास्ट करो…ब्लास्ट करो…, पब्जी खेळताना तरुणाचा मृत्यू
(Father cheats in Ludo game daughter approaches court)