कोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत (Announcement of Ajit Pawar in Pune).

कोल्हापुरात अंबाबाई विकास आराखडा, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा
Follow us
| Updated on: Jan 27, 2020 | 7:14 PM

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत (Announcement of Ajit Pawar in Pune). अजित पवार यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई विकास आराखड्यासह, साताऱ्यात शिवाजी महाराज संग्रहालय आणि इतर अनेक कामांसाठी निधी देण्याची घोषणा केली. ते आज (27 जानेवारी) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मागील 5 वर्षात पुणे जिल्हाला 98 कोटी निधी कमी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला (Announcement of Ajit Pawar in Pune). तसेच गिरीश बापट नाहीत, अन्यथा त्यांना कागदपत्रं दाखवली असती, असा टोलाही लगावला.

अजित पवार म्हणाले, “सध्या आम्ही मागील सरकारने ठरवलेल्या निधीच्या स्वरुपावरच काम करतो आहे. मागील 5 वर्षात पुणे जिल्ह्याला 98 कोटी रुपयांचा निधी कमी मिळाला. आज गिरीश बापट नाहीत. अन्यथा त्यांना कागदपत्रं दाखवली असती. आजच्या बैठकीत पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील लोकांच्या मागण्यांवर चर्चा केली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई विकास आराखड्याला मंजुरी दिली. इचलकरंजीच्या मेमोरियल हॉस्पिटलला निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रंकाळा तलावाचे काम करण्याचे ठरले आहे.”

साताऱ्यातील कास तलावाची उंची वाढवण्यासाठी, शिवाजी महाराजांच्या संग्रहालयासाठी, सातारा विश्रामगृहसाठी, सज्जनगड येथे रोप-वेसाठी आणि साताऱ्यातील मेडिकल कॉलेजसाठी निधी देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात महापुरात नुकसान झाले त्यांना मदत देण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, “सांगली पुराला अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. मात्र कर्नाटक सरकार हे मान्य करत नाही. यासाठी जलसंपदा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात माहिती घेण्यास सांगितलं आहे. एनडीआरएफसाठी काही बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या बोटी चालवण्यासाठी त्या-त्या गावातील मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्या भागात आदिवासी आश्रमशाळा आहेत, त्याठिकाणी सेंट्रल किचनची योजना आणणार आहे.”

पंकजा मुंडे यांनी उपोषण मागे घ्यावं : अजित पवार

अजित पवार यांनी अनेक योजनांची केवळ नावं बदलली जात असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या उपोषणावरही टीका केली. ते म्हणाले, “पंकजा मुंडे 5 वर्षे सरकारमध्ये होत्या. त्यांच्या विचारांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही सरकारमध्ये होते. मात्र, त्या आज उपोषण करत आहेत. लोकशाहीमध्ये सर्वांना उपोषण करण्याचा अधिकार आहे. त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं, अशी मी त्यांना विनंती करतो.”

“मी सरकारला अडचणीत आणू इच्छित नाही”

अजित पवार म्हणाले, “चंद्रपूरच्या दारुबंदी संदर्भात आम्ही विजय वडडेट्टीवारांशी बोलू. मी आज नागपूरला जातो आहे. त्याठिकाणी विजय वडेट्टीवार भेटणार आहेत. त्यांच्याशी बोलून यावर निर्णय घेऊ. आमचं बरं चाललं आहे, ते चालूद्या. उगाच शिळ्या कडीला उत आणू नका. मी सरकारला अडचणीत आणू इच्छित नाही. या सर्व चर्चा सरकार स्थापनेपूर्वीच्या होत्या. एल्गार परिषदेवर आमचे वरिष्ठ नेते बोललेत त्यावर मी काहीही बोलणार नाही.”

मी सकाळी लवकर उठून काम करणारा नेता आहे. तुमची शांत वामकुक्षी व्हावी यासाठी मी 4 वाजता पत्रकार परिषद घेतली, असं म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांनाही टोला लगावला.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.