Mahad Building Collapse | महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह आर्किटेक, मुख्याधिकारी आणि नगर अभियंत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे (FIR in Mahad Building Collapse).

Mahad Building Collapse | महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 11:37 PM

रायगड : महाड येथील काजळीपुरातील तारीक गार्डन इमारत दुर्घटनेत अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागला. यानंतर आता बिल्डरसह आर्किटेक, मुख्याधिकारी आणि नगर अभियंता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे (FIR in Mahad Building Collapse). तारीक गार्डन ईमारत दुर्घटनेनंतर निकृष्ट काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची जोरदार मागणी होत होती. आता या 5 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेतील पीडित कुटुंबांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

महाडच्या या दुर्घटनेनंतर बिल्डरसह महाड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमधून प्रचंड चीड व्यक्त करण्यात आली. पीडित कुटुंबांकडून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही झाली. आता या दुर्घटनेप्रकरणी 5 जणांविरोधात महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. महाड नगरपालिकेचे अभियंते सुहास सिताराम काळे यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Mahad Building Collapse | महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु

निकृष्ट बांधकाम करणे आणि त्याला मंजूर देणे यासाठी फारुक महामुद मिया काझी (रा.तळोजा, नवी मुबंई), गौरव शहा, व्हिकल्स आर्किटेक्ट अँड कन्स्लटंट (नवी मुंबई), बाहूबली टी. धमाणे, आरसीसी सल्लागार, अवनी कन्स्लटंट (नवी मुंबई), दिपक झिझाड (तत्कालीन मुख्याधिकारी महाड) आणि तत्कालीन कनिष्ट बांधकाम पर्यवेक्षक शशिकांत दिये (महाड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भादंवि कलम 334, 334(अ), 337, 338, 34 नुसार सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणा करुन इतरांच्या जीवितास दुखापत आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सणस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर, इंजिनियर आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. या प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नागरिकांमधूनही अशीच मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

Mahad Building Collapse Live | मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत, मंत्री वडेट्टीवारांची घोषणा

Mahad Building Collapse | मोहम्मदची मृत्यूवर मात, 5 वर्षाचा चिमुकला 19 तासांनी ढिगाऱ्याबाहेर

Mahad Building Collapse | इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर तात्काळ कारवाई : एकनाथ शिंदे

संबंधित व्हिडीओ :

FIR in Mahad Building Collapse

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.