Photo Fire Service | अग्निशमन सेवा दिनानिमित्त फायर ड्रिल स्पर्धा, नागपुरात विविध प्रकारच्या अॅक्टिव्हीटी
नागपूर : कोरोनामुळे दोन वर्षानंतर राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शनिवारी वार्षिक ड्रिल स्पर्धा घेण्यात आली. यात त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राने 1 मिनिटं 10 सेकंदात ड्रिल पूर्ण करीत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच लकडगंज अग्निशमन केंद्र 1 मिनिट 11 सेकंदात ड्रिल पूर्ण करून द्वितीय तर सक्करदरा अग्निशमन केंद्र 1 मिनिट 12 सेकंदात ड्रिल पूर्ण करून तृतीय स्थान पटकाविला. तर वैयक्तिक शिडी ड्रिल स्पर्धेत बबन जाधव (26 से.) विजेता ठरला.
Most Read Stories