Fire | हैदराबादमध्ये केमिकल फॅक्टरीत रिअॅक्टरचा स्फोट, भीषण आगीत अनेक जण जखमी
हैदराबादच्या (Hyderabad) सीमेवरील भागात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत (Chemical factory fire) भीषण आग लागली आहे.
हैदाराबाद : हैदराबादच्या (Hyderabad) सीमेवरील भागात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत (Chemical factory fire) भीषण आग लागली आहे. फॅक्टरीतील रिअॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. या आगीत अनेक लोक जखमी झाले आहेत. संगारेड्डी जिल्ह्यातील आयडीए बोलाराम इंडस्ट्रियल भागात (Bolarum factory fire) ही आगीची घटना घडली. रिअॅक्टरच्या स्फोटाने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे (Fire in Bolarum Chemical factory Hyderabad due to explosion in reactor ).
फॅक्टरीत स्फोट झाला तेव्हा अनेक कामगार काम करत होते. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
या आगीत आतापर्यंत नेमके किती लोक जखमी झाले आहेत याची अधिकृत माहिती येणं बाकी आहे. असं असलं तरी हा स्फोट खूप मोठा असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. फॅक्टरीत हा स्फोट झाल्यानंतर आगीच्या ज्वाळा खूप वेगाने आजूबाजूच्या परिसरात पसरल्या. यानंतर आकाशात धुराचे प्रचंड मोठे लोटही दिसत आहेत.
Telangana: Eight people injured in a massive fire that broke out at Vindhya Organics Pvt Ltd in Industrial Development Area, Bollaram of Hyderabad.
Police say, “A solvent was kept for some reaction after which it caught fire. Injured shifted to hospital. Rescue operation is on” pic.twitter.com/7XTb7CahiU
— ANI (@ANI) December 12, 2020
या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी झालेल्या कामगारांना रुग्णालयात हलवले जात आहे. या फॅक्टरीतील 2 रिअॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आगीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा :
Fire | गुजरातमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, एटीएमसह अनेक दुकानं जळून राख
लालबागमध्ये गणेश गल्लीत आगीचा भडका, एका महिलेचा मृत्यू, तर 9 जणांची प्रकृती गंभीर
भीषण आगीत भाताचं पीक जळून खाक; शेतकऱ्याला अडीच लाखाचा फटका
व्हिडीओ पाहा :
Fire in Bolarum Chemical factory Hyderabad due to explosion in reactor