विशाखापट्टनममधील केमिकल कंपनीत भीषण आग, अनेकजण जखमी

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनम येथे सोमवारी (13 जुलै) रात्री एका फार्मास्युटीकल कंपनीत मोठा स्फोट झाला (Fire in chemical company of Vishakhapattanam).

विशाखापट्टनममधील केमिकल कंपनीत भीषण आग, अनेकजण जखमी
Follow us
| Updated on: Jul 14, 2020 | 8:19 AM

विशाखापट्टनम: आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनम येथे सोमवारी (13 जुलै) रात्री एका फार्मास्युटीकल कंपनीत मोठा स्फोट झाला (Fire in chemical company of Vishakhapattanam). यामुळे लागलेल्या भीषण आगीत अनेकजण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे परवाडा भागातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच या भागात एलजी पॉलीमर्समध्ये गॅस गळतीमुळे मोठा अपघात झाला होता. यात 14 जणांचा मृत्यू झाला होता.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा फार्मा सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. रेमकी सॉल्व्हंट्सच्या एका भागात कोस्टल वेस्ट प्रकल्पाच्या ठिकाणी ही घटना घडली. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही. या स्फोटामुळे लागलेली आग इतकी भीषण होती की संपूर्ण विशाखापट्टनम शहरातून ही आग दिसत होती. आगीवर विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कुणाचीही जीवितहानी झालेली नाही. स्फोट झाला तेव्हा घटनास्थळावर केवळ 4 जण हजर होते. स्फोटानंतर आग पसरण्याच्या आधी तेथून बाहेर पळाले. ही आग कंपनीतील रिअॅक्टरपासून सुरु झाली आणि नंतर कंपनीच्या इतर भागात पसरली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

आंध्र प्रदेश सरकारने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, ही घटना विजागमधील परवाडा येथे लागली. नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही. पोलीस अधिकारी देखील घटनास्थळावर हजर आहेत. विशाखापट्टनमचे पोलीस आयुक्त व्यक्तिगत पातळीवर या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. आग विझवण्याचं काम सुरु आहे.

हेही वाचा :

Pune Lockdown | पुणे-पिंपरीमध्ये लॉकडाऊन; रस्ते-पेठांचे भाग बंद, सात हजार पोलिस तैनात

Pune Lockdown | पुण्यात कडकडीत लॉकडाऊन, आयटी, दूरसंचार कंपन्या, एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार

आठवड्याभराच्या कडकडीत लॉकडाऊननंतर जळगाव पुन्हा सुरु होणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जारी

Fire in chemical company of Vishakhapattanam

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.