भिवंडीत 1 लाख स्क्वेअर फुटाच्या गोडाऊनला आग, 12 तास उलटूनही आगीवर नियंत्रण नाही

भिवंडीतील प्रेरणा कम्पाऊंड येथील एका केमिकल गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळावर प्रयत्न करत आहेत.

भिवंडीत 1 लाख स्क्वेअर फुटाच्या गोडाऊनला आग, 12 तास उलटूनही आगीवर नियंत्रण नाही
Follow us
| Updated on: Jul 23, 2019 | 4:42 PM

ठाणे : भिवंडीतील प्रेरणा कम्पाऊंड येथील एका केमिकल गोडाऊनला मध्यरात्री एकच्या सुमारास लागलेली आग अजूनही धुमसत आहे. भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रेरणा कम्पाउंड येथे ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळावर प्रयत्न करत आहेत. आग मोठी असल्याने आगीवरील नियंत्रण मिळवण्यासाठी जास्त वेळ लागत आहे.

आग धुमसत असून ती विझवण्यासाठी भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर एमआयडीसीच्या अग्निशामक गाड्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत. गायत्री कॉम्प्लेक्स येथे पाण्याची कमतरता भासत असल्याने आग विझवण्यासाठी अजून 12 तास लागू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. आग लागलेलं गोडाऊन 1 लाख स्क्वेअर फूट इतकं अवाढव्य आहे. त्यात रबर साठवलेले होते. त्यामुळे आग झपाट्याने वाढली आहे.

मुंबई आणि परिसरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. याआधीही झालेल्या घटनांमध्ये नागरिकांना जीव गमवावे लागले होते. मात्र, आग लागल्यास उपाययोजना म्हणूनच्या व्यवस्था तोकड्याच पडत असल्याचे दिसत आहे. तसेच संबंधित कंपन्यांना परवानगी देताना आगीवर नियंत्रण मिळवण्याची मुलभूत साधनांचीही तपासणी किती गांभीर्याने होत आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.