Fire | गुजरातमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, एटीएमसह अनेक दुकानं जळून राख

गुजरातमधील अहमदाबाद येथे आज (6 डिसेंबर) एका बहुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली.

Fire | गुजरातमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, एटीएमसह अनेक दुकानं जळून राख
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:48 AM

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे आज (6 डिसेंबर) एका बहुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत इमारतीतील एक बँक एटीएम आणि अनेक दुकानं जळून राख झाले. असं असलं तरी या आगीत अद्याप कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. 2 तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आली (Fire on second floor of Multi Storey  Building in ahmedabad Gujrat many shops burnt including Bank ATM).

अग्निशमन दलाचे अतिरिक्त मुख्य अधिकारी राजेश भट्ट म्हणाले, “ही आग सकाळी जवळपास 7 वाजता चहाच्या दुकानाला लागल्याचा अंदाज आहे. त्यानंतर ही आग सायंकाळपर्यंत या इमारतीच्या तळ मजला आणि पहिल्या मजल्यापर्यंत पोहचली. बापूनगर परिसरात असलेल्या या इमारतीच्या परिसरात जवळपास 28 दुकानं आहेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोबाईल फोन आणि इतर दुकानं आहेत.

“या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग विझवण्यासाठी जवळपास 12 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. एफएसएल तज्ज्ञ आग लागण्याच्या कारणांचा शोध घेत आहेत. सुरुवातीच्या तपासात शेजारी असलेल्या चहाच्या दुकानात आग लागून ती पसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे,” अशी माहिती भट्ट यांनी दिली. या आगीत या इमारतीतील एक एटीएम जळालं आहे आणि काही दुकानांनाही आग लागली. या आगीत झालेल्या नुकसानीची मोजणी सुरु आहे.

कपड्यांच्या गोदामातही आग

अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वीच एका कपड्याच्या गोदामात देखील आग लागली होती. आगीनंतर त्या इमारतीत स्फोट होऊन छतही कोसळलं. या दुर्घटनेत तेव्हा 9 जणांचा मृत्यू झाला. 4 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचीही भीती व्यक्त करण्यात आली.

संबंधित बातम्या :

लालबागमध्ये गणेश गल्लीत आगीचा भडका, एका महिलेचा मृत्यू, तर 9 जणांची प्रकृती गंभीर

लालबागमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, आगीत होरपळून 13 स्थानिक जखमी

साकीनाक्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, भीषण आगीत 5 होरपळले, एका मुलीचा मृत्यू

Fire on second floor of Multi Storey  Building in ahmedabad Gujrat many shops burnt including Bank ATM

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.