मालदीवचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर जादूटोणा, मंत्र्याला केली अटक, आधी जवळ आले आणि…
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आणखी एका कारणाने चर्चेत आहेत. त्याच्यावर जादूटोणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मुइज्जूवर हे कृत्य केल्याप्रकरणी त्याच्या एका मंत्र्यालाही अटक करण्यात आली आहे.
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर मुइझू त्यांच्या भारतविरोधी धोरणांमुळे चर्चेत राहिले. मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांनी चीनच्या जवळ जात भारताला विरोध केल्याचा आरोप करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांना आपल्या देशातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. भारतासोबतच्या वाढत्या तणावामुळे मुइज्जू यांना भारत आणि मालदीवमध्ये खूप टीकेला सामोरे जावे लागले. आता आणखी एका कारणाने मुइज्जू चर्चेत आले आहेत. मालदीवमधील पर्यावरण मंत्रालयाच्या एका राज्यमंत्र्याला राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्याशी जवळीक साधून जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. फातिमथ शमनाज अली सलीम असे अटक करण्यात आलेल्या मंत्र्याचे नाव आहे.
शमनाज या राष्ट्रपती कार्यालयाचे मंत्री ॲडम रमीझ यांच्या घटस्फोटीत पत्नी आहेत. शमनाज यांना अटक करण्यापूर्वी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यांच्या घरातून काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. शमनाज यांना तीन मुले आहेत. सर्वात लहान मुलगा हा एक वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. शमनाज यांना अटक केल्यांनतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, शमजानच्या माजी पतीलाही निलंबित करण्यात आले आहे. शमनाज यांनी यापूर्वी राष्ट्रपती भवन मुळीगेमध्ये काम केले होते. मात्र, नुकतीच त्यांची पर्यावरण मंत्रालयात बदली झाली. ॲडम रमीझ याआधी राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जात होते . पण, गेले अनेक महिन्यांपासून ते मुइज्जू यांच्यासोबत दिसले नाहीत. त्यामुळे शमनाज यांच्यासोबत तिच्या माजी पतीलाही निलंबित करण्यात आले आहे.