VIDEO : एका पायाने माऊंट एव्हरेस्ट सर, पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक
आतापर्यंत आपण अनेक लोक पाहिले आहेत ज्यांची जिद्द पाहून इतरांनाही प्रेरणा मिळते. अशाच एका व्यक्तीची आज आम्ही तुम्हाला ओळख करुन देणार आहोत.
लखनऊ : आतापर्यंत आपण अनेक लोक पाहिले आहेत ज्यांची जिद्द पाहून इतरांनाही प्रेरणा मिळते. अशाच एका व्यक्तीची आज आम्ही तुम्हाला ओळख करुन देणार आहोत. त्या व्यक्तीची जिद्द पाहून इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. कृत्रिम पाय असूनही या जिद्दी व्यक्तीने थेट जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एव्हरेस्ट सर (Arunima sinha mount everest) केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात भारताचे नाव मोठे झाले आहे. त्या जिद्दी व्यक्तीचे नाव अरुणिमा सिन्हा (Arunima sinha mount everest) आहे. अरुणिमाचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
अरुणिमा सिन्हा एक राष्ट्रीय वॉलीबॉल खेळाडू होती. पण 2011 मध्ये तिच्यावर गुंडाकडून ट्रेनमध्ये हल्ला झाला. त्यावेळी गुंडानी चेन स्नॅचिंग करताना अरुणिमाला ट्रेनमधून फेकून दिले होते. त्यामुळे तिला दुखापात झाली होती. यामध्ये तिने आपला एक पाय गमावला होता.
माननीय श्री @narendramodi जी ?? को साफ़ नीयत, सही विकास की नीति की एतिहासिक जीत के लिए हार्दिक शुभकामनाएँ? Victory of work and dedication for Nation?
Jai Hind.#primeministerofindia#PhirEkBaarModiSarkaar #Election2019Results#BJP4India ?? pic.twitter.com/verfiQG4Ai
— Dr. Arunima Sinha (@sinha_arunima) May 24, 2019
या अपघातावेळी ती रात्रभर रेल्वे ट्रॅकवर पडून राहिली होती. या अपघातात तिला एक पाय गमवावा लागला आणि दुसऱ्या पायात रॉड टाकावा लागला. त्यामुळे तिच्या करिअरमध्ये मोठी अडचण निर्माण झाली. पण या अपघातानंतरही अरुणिमा थांबली नाही. तिने मनात ठरवले होते की, काही तरी वेगळं करायचे, यानंतर तिने दोन वर्षांनी स्वत:ला सावरले आणि कृत्रिम पायाच्या मदतीने थेट जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट पर्वत सर केला. एव्हरेस्टवर जाऊन तिने भारताचा झेंडाही फडकवला.
याशिवायही तिने आतापर्यंत 6 पर्वत चढून एक वेगळा विक्रम रचला आहे. 2015 मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अरुणिमाचा विश्वास पाहून प्रत्येक मिहलेला यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. तिच्या मजबूत अशा आत्मविश्वासामुळे तिने हे यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुणिमाचे कौतुक केले आहे.