लिंगायत मठाच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच मुस्लिम तरुणाची नियुक्ती

कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातील लिंगायत मठाच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका मुस्लिम तरुणाची नियुक्ती करण्यात आली (appoint Muslim youth on lingayat mautt) आहे.

लिंगायत मठाच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच मुस्लिम तरुणाची नियुक्ती
Follow us
| Updated on: Feb 20, 2020 | 5:16 PM

बंगळुरु : कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातील लिंगायत मठाच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका मुस्लिम तरुणाची नियुक्ती करण्यात आली (appoint Muslim youth on lingayat mautt) आहे. दिवाण शरीफ रहिमानबस मुल्ला असं या 33 वर्षीय मुस्लिम तरुणाचं नाव आहे. आतापर्यंत कधीच मठाच्या प्रमुखपदी विवाहित आणि मुस्लिम तरुणाची नियुक्ती करण्यात आली नव्हती. येत्या 26 फेब्रुवारी रोजी मठाधीपती म्हणून मुल्ला काम पाहणार (appoint Muslim youth on lingayat mautt) आहेत.

कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यात असणाऱ्या असुती मठाच्या मठाधिपती म्हणून मुल्ला यांची निवड झाली आहे. असुती मठ कलबुर्गीतल्या खजुरी गावतल्या कोरणेश्वर संस्थानाशी संलग्न आहे. या कोरणेश्वर संस्थानला 350 वर्षाची परंपरा आहे. असुती मठ चित्रदुर्गच्या प्रसिद्ध श्री जग्दगुरु मुरुगराजेंद्र मठाशी संलग्न आहे.

“आमच्यासाठी धर्म आणि व्यक्ती महत्वाचा नाही. आमच्या तत्वांनुसार आचरण असणारा व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असो आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही”, असं खजुरी मठाचे मठाधिपती मुरगराजेंद्र कोरणेश्वर शिवयोगी यांनी सांगितले.

लिंगायत समाज स्वामी बसवेश्वर स्वामी यांना मानणारा समाज आहे. दिवाण शरीफ मुल्ला हे मुस्लिम समाजात जन्माला आले असले तरी त्यांचे आई-वडील बसवश्वर स्वामी यांचे कट्टर भक्त होते. त्यामुळे मुल्ला यांच्यावर लहानपणापासून लिंगायत धर्मांचे संस्कार झाले.

“बाराव्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वर स्वामी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मला समाजासाठी काम करण्याची माझी इच्छा होती. माझ्या आई-वडिलांनी स्वामी बसवेश्वर स्वामी यांना मुलगा अपर्ण केला होता. मलासुद्धा आता त्याचप्रमाणे स्वामींच्या शिकवणीचा प्रसार करायचा आहे”, असं दिवाण शरीफ रहिमानबस मुल्ला यांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.