तुमचे लाडके कलाकार आपल्या फिटनेसवर विषेश लक्ष देतातच मात्र खेळाडूंकडे बघायला गेलं तर त्यांना फिटनेस मेन्टेन करणं अगदी महत्वाचं ठरतं. शेवटी खेळात फिट असणं महत्वाचं असतं. सध्या हार्दिक पंड्या त्याच्या फिटनेससाठी चर्चेत आहे.
हार्दिक पंड्याच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. त्याचे सिक्स पॅक्स अनेकांचं लक्ष वेधून घेतात. या परफेक्ट बॉडीसाठी हार्दिक दररोज एक्सरसाईज, योगा, जिम आणि डायट फॉलो करतो.
सोशल मीडियावर फिल्मस्टार्स आणि क्रिकेटर्स यांचे वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या हार्दिक पंड्याचा वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये हार्दिक पंड्याचं फिटनेससाठी डेडीकेशन दिसत आहे.
हार्दिकचा स्ट्रेचिंग करतानाचा हा फोटोही जबर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. या फोटोमध्ये तो स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. स्ट्रेचिंग केल्यानं कोर मसल्स मजबूत होतात आणि पाठीचा त्रासही कमी होतो.