बाबासाहेबांना अभिवादन करुन परतताना भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंडेकर यांच्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील महू येथून परतताना कुटुंबावर काळाने घाला घातलाय. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय, तर सहा जण जखमी आहेत. दुर्दैवाने या अपघातात पाच महिन्यांच्या चिमुकल्याचाही मृत्यू झाल्याने या घटनेने प्रत्येकाचं मन हेलावून गेलंय. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर-पुणे महामार्गावरील अंजनी फाट्याजवळ ट्रक आणि स्कॉर्पिओचा […]
बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंडेकर यांच्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील महू येथून परतताना कुटुंबावर काळाने घाला घातलाय. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय, तर सहा जण जखमी आहेत. दुर्दैवाने या अपघातात पाच महिन्यांच्या चिमुकल्याचाही मृत्यू झाल्याने या घटनेने प्रत्येकाचं मन हेलावून गेलंय. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर-पुणे महामार्गावरील अंजनी फाट्याजवळ ट्रक आणि स्कॉर्पिओचा अपघात झाला.
अपघातग्रस्त जुमडे कुटुंबामधील सर्व जण मध्यप्रदेशमधील महू येथे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. महू ही आंबेडकरांची जन्मभूमी असल्याने जुमडे कुटुंब दरवर्षी अभिवादन करण्यासाठी महूला जात होतं. जुमडे कुटुंबीय अंजनी गावचे आहेत. अपघातस्थळापासून त्यांचं घर अवघं एक किमी अंतरावर होतं. दुर्दैवाने घर येण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली आणि स्कॉर्पिओमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण अंजनी गावावर शोककळा पसरली आहे. घटना झाल्यावर मात्र घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर असून 4 जण स्थिर आहेत.
माहितीनुसार, अंजनी येथील जुमडे कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक दरवर्षी मध्यप्रदेश येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असतात. यावर्षीही अभिवादन करून ते परतत होते. मात्र ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये मनोहर जुमडे (50), गोलू जुमडे (22), जयवंता जुमडे (60), कोमल जुमडे (60), राजरत्न जुमडे (वय 05 महिने) या लहान बाळाचाही समावेश आहे.
व्हिडीओ :